शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: शिवप्रेमींचा गनिमी कावा, आष्ट्यात रात्रीत उभारला शिवरायांचा अश्वारुढ पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 14:00 IST

परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप

आष्टा : येथील छत्रपती शिवाजी चौकात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण माने व सहकाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्री छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा बसवला. सकाळी हा प्रकार लक्षात येताच शहरासह परिसरात खळबळ उडाली.आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा, यासाठी माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांच्या आकस्मित निधनानंतर प्राचार्य विशाल शिंदे यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. मात्र, अद्याप पुतळ्याचे काम सुरू न झाल्याने शिवसेनेचे पोपट भानुसे, सुधीर पाटील, मोहन पाटील, वीर कुदळे, अमोल पडळकर, दीपक आवटी यांच्यासह सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते.आंदोलनाला पुतळा समितीनेही पाठिंबा दिला हाेता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, विशाल शिंदे, झुंजारराव पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही धरणे आंदोलन केले. प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून पालिकेला बगीच्यासाठी दीड गुंठा जागा चार जानेवारीपर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यादृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते.सोमवारी रात्री प्रवीण माने व सहकाऱ्यांनी गनिमी काव्याने शिवाजी चौकात चबुतरा तयार करून छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा बसवला.याबाबतची माहिती मिळताच अतिरिक्त तहसीलदार धनश्री भांबुरे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, पोलिस निरीक्षक अजित सिद, सहायक निरीक्षक मनमित राऊत, महेश गायकवाड, अण्णासाहेब बाबर, संजय सनदी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. उशिरापर्यंत प्रशासन व भाजपच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. दरम्यान संघर्ष समिती व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना फोन करून घटनेची माहिती दिली.पुतळ्याच्या उभारणीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असताना अचानक भाजप नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे खळबळ उडाली होती.परिसराला पोलिस छावणीचे स्वरुपभाजपने सोमवारी रात्री छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याची माहिती समजतात शिवाजी चौकात नागरिकांनी गर्दी केली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी जिल्ह्यातील पोलिस व अर्ध सैनिक बलाची पथके आष्ट्यात दाखल झाली. यामुळे परिसराला पाेलिस छावणीचे रुप आले हाेते.

टॅग्स :SangliसांगलीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज