शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

सांगली रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म होणार

By शीतल पाटील | Updated: September 9, 2023 11:35 IST

नागरिक जागृती मंचाच्या प्रयत्नाला यश

सांगली : सांगलीरेल्वे स्थानकावर अतिरिक्त प्लॅटफाॅर्मच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे नव्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्लॅटफार्मचे काम ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. नागरिक जागृती मंचाने जादा प्लॅटफाॅर्मसाठी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले.सांगली रेल्वे स्टेशन येथील दोन अतिरिक्त प्लॅटफॉर्म बांधण्याची मागणी होती. नवीन प्लॅटफार्म न झाल्यास रेल्वे स्टेशनची क्षमताच संपेल व भविष्यात नवीन गाड्या सोडता येणार नाही. या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मिळणार नाही,अशी भीती जिल्ह्यातील नागरिकांत होती. नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांना याबाबत रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून अतिरिक्त प्लॅटफार्मची मागणी केली. रेल्वे प्रशासनाने नवीन प्लॅटफॉर्म चे बांधकाम सुरू होणार असून ऑक्टोबरपर्यंत बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे लेखी पत्र दिले आहे. सध्या पुणे ते लोंढा रेल्वे मार्गाच्या दुपरीकरणाचे काम सुरू आहे. भिलवडी, ताकारी, शेणोली, भवानीनगर सारख्या रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म बांधून काम पूर्ण करण्यात आले. पण महापालिका मुख्यालय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाण असलेल्या सांगली रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म बांधण्यात आलेली नव्हते. प्लॅटफॉर्म न बांधताच दुपदरीकरणातील दुसरी मेन रेल्वे लाईन सुरू करण्यात आली व रेल्वे गाड्यांची वाहतूक देखील सुरू करण्यात आली.आता नवीन प्लॅटफार्म मंजूर झाल्याने रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधेबाबत प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली नाही. पण त्याचा फायदा सांगली ते कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, लातूर, पंढरपूर या गाड्या सुरू होऊ शकतील, असे साखळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे