शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कायद्यातील दुरुस्तीमुळे स्वायतत्ता संपुष्टात; सांगली बाजार समितीत निदर्शने, कामकाज ठप्प

By संतोष भिसे | Updated: August 1, 2023 17:32 IST

'कामगारांची सुरक्षितताही धोक्यात येणार'

सांगली : माथाडी कायद्यातील प्रस्तावित सुधारणांना विरोधासाठी हमाल पंचायतीने तीव्र निदर्शने केली. बाजार समिती आवारात माथाडी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने माथाडी कामगार आंदोलनासाठी एकत्रित आले. यामुळे समितीतील व्यवहार दिवसभर थंडावले.हमाल पंचायतीचे नेते विकास मगदुम यांच्यासह वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे आदींनी नेतृत्व केले. आंदोलनात हमाल, माथाडी, तोलाईदार, महिला कामगार सहभागी झाले. माथाडी मंडळाच्या अध्यक्षांना निवेदन दिले.आंदोलकांनी सांगितले की, सध्याच्या माथाडी कायद्यात सुधारणेऐवजी नकारात्मक बदल केल्याचे दिसत आहे. विधीमंडळात विधेयकाचा मसुदा मांडण्यापूर्वी सर्वसामान्यांना माहिती दिली नाही. हरकती व सूचनाही मागवल्या नाहीत. त्यामुळे त्यामागील हेतू संशयास्पद वाटतो. नव्या कायद्यामुळे माथाडी मंडळातील लोकशाही संपुष्टात येण्याची भिती आहे. कामगारांची सुरक्षितताही धोक्यात येणार आहे. विविध संस्थांना या कायद्याची अंमलबजावणी टाळण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.विकास मगदुम म्हणाले की, मंडळाच्या कामकाजावर अंकुश ठेवण्यासाठी प्राधिकरण निर्माण करण्यात येत आहे, त्यामुळे मंडळाची स्वायत्तता संपणार आहे. विधेयक संमत केल्यास माथाडी कामगार राज्यभरात रस्त्यावर उतरुन आंदोलने करतील.आंदोलनात बाळासाहेब बंडगर, शशिकांत नागे, बापूसाहेब बुरसे, संग्राम पाटील, नगरसेवक मनोज सरगर, शोभा कलकुटगी, शालन मोकाशी, सुलाबाई लवटे, राघू बंडगर, किरण रुपन, आदगौंडा गौंडाजे, श्रीकांत पुस्तके, प्रल्हाद व्हनमाने, राजाराम बंडगर, बजरंग खुटाळे आदी सहभागी झाले.

 सौदे ठप्प, व्यवहारांवर परिणामआंदोलनामुळे बाजार समितीतील हळद, गुळाचे सौदे ठप्प झाले. अन्य व्यवहारांवरही परिणाम झाला. औद्योगिक वसाहतीमधील माथाडी कामगारांनीही आंदोलनात सहभाग घेतल्याने तेथील मंगळवारचे कामकाज थंडावले. हमाल भवनमध्ये आंदोलकांची सभा झाली. तेथून माथाडी मंडळापर्यंत मोर्चा निघाला. मंडळासमोर विधेयकाची होळी करण्यात आली.

टॅग्स :Sangliसांगली