शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: सलगरेतील भूसंपादनाविरोधात तरुणांनी अन्नपाणी त्यागले, लॉजिस्टिक पार्कसाठी शेती देण्याला विरोध

By संतोष भिसे | Updated: October 5, 2023 16:47 IST

दोघांची प्रकृती खालावली 

सांगली : सलगरे (ता. मिरज) येथील सुमारे ३०० एकर शेतजमीन मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्कसाठी देण्यास आंबेडकरी समाजाने तीव्र विरोध दर्शविला आहे. नऊ तरुणांनी तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. त्यातील दोघांची प्रकृती खालावली आहे.सलगरे येथे मिरज रस्त्यावर पंपगृहानजिक ही जमीन आहे. सुमारे ५० वर्षांपूर्वी ती आंबेडकरी समाजाला कसण्यासाठी देण्यात आली. बॅकवर्ड क्लास सहकारी सामूदायिक शेती सोसायटी या नावाने मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या ताब्यात होती. २००५ मध्ये संस्थेची नोंदणी रद्द होऊन अवसायानात निघाली. शेतकऱ्यांच्या वारसांनी लेखापरिक्षण किंवा अन्य शासकीय प्रक्रिया पार पाडली नाही, त्यामुळे संस्थेची नोंदणी रद्द झाली. सध्या ती मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यासाठी देण्याचे घाटत आहे. एमआयडीसीने तसा प्रस्ताव नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंटला दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीवरील हक्क सोडावा, बेकायदेशीररित्या ताब्यात ठेऊ नये अशा स्वरुपाच्या नोटिसा जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्या आहेत.याला सलगरेतील आंबेडकरी समाजाने आव्हान दिले आहे. धनराज कांबळे, मनोज  कांबळे, शंकर कांबळे, हिंदुराव कांबळे, रमेश कांबळे, शैलेश कांबळे, चन्नाप्पा कांबळे, ऋत्विक कांबळे या नऊ तरुणांनी आंदोलन सुरु केले आहे. त्यांना पाठिंब्यासाठी गावातून आंबेडकरी समाजाने गर्दी केली आहे. दरम्यान, हिंदुराव आणि ऋत्विक या दोघांची प्रकृती बुधवारी ढासळली. डॉक्टरांनी तपासणीअंती रुग्णालयात उपचार आवश्यक असल्याचे सांगितले, पण उपोषणकर्त्यांनी त्याला नकार दिला. सध्या ते आजारी अवस्थेतच उपोषण करत आहेत.

पार्क नाही, मग जमीन कशासाठी?आंबेडकरी समाजाने माहिती अधिकारात विचारणा केली असता, पार्कसाठीच्या थेट खरेदीने जमीन संपादित करण्याच्या प्रस्तावात या शेतकऱ्यांच्या जमिनीचा उल्लेख नाही असे उत्तर प्रशासनाने दिले होते. जमीन सोडण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिशीत मात्र ही जमीन लॉजिस्टिक पार्कसाठी एमआयडीसीने प्रस्तावित केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासन दिशाभूल करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ही जमीन पार्क किंवा अन्य कोणत्याही उद्योगासाठी संपादित करु नये अशी आंदोलकांची मागणी आहे.  

सलगरेमध्ये लॉजिस्टिक नसल्याचे उत्तरदरम्यान, जानराववाडी (ता. मिरज) येथील डॉ. दत्ताजीराव कुंडले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रबंधनला माहिती अधिकारात विचारणा केली असता, केंद्र सरकारने देशभरात ३५ ठिकाणी मंजूर केलेल्या जागांमध्ये सलगरेचा समावेश नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या जागेच्या संपादनाचे कारण काय? असा प्रश्न पुढे येत आहे.

टॅग्स :Sangliसांगली