शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

Sangli: बेडग येथील आंबेडकरी समाजाने पुन्हा गाव सोडले, माणगाव ते मुंबई लॉंग मार्च

By संतोष भिसे | Updated: September 11, 2023 19:03 IST

प्रशासनाने फसविल्याचा आरोप

बेडग : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याप्रकरणी येथील आंबेडकरी समाजाने सोमवारी पुन्हा मुंबईकडे लॉंग मार्चसाठी कूच केले. माणगाव (ता. हातकणंगले) येथून मुंबईला पायी जाण्यासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव गावातून सकाळी  रवाना  झाले.दरम्यान, आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. अधिकाऱ्यांची विनंती व आवाहन त्यांनी झुगारुन लावले. कमानीचा पेटलेला वाद तीन महिन्यांपासून धुमसतच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमीन शासनातर्फे उभी करुन देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही ग्रामस्थांनी त्याविरोधात भूमिका घेतली. गावात कोणत्याही महापुरुषाच्या नावे स्वागत कमान उभी करायची नाही असा ठराव केला. त्यामुळेही वाद पुन्हा पेटला आहे.

दोन महिन्यांपूर्वीही आंबेडकरी समाज बेडगमधून मुंबईकडे निघाला होता. पण मुंबईतील बैठकीत फडणवीस कमान पुन्ही उभी करण्याचे आणि संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुन्हे दाखल झाले, पण कमानीची पूर्तता होऊ शकली नाही. याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. कमानीएएवजी गावात मोठी अभ्यासिका उभी करु, पण लॉंग मार्च काढू नका असे ग्रामपंचायतीचे आवाहन आंदोलकांनी झुगारुन लावले आहे.सोमवारी सकाळी सुमारे २५० ते ३०० महिला-पुरुष आंदोलक मार्चसाठी गावातून रवाना झाले. निळे झेंडे घेतलेले व निळ्या टोप्या घातलेले महिला व तरुण सहभागी झाले होते. स्वतंत्र वाहनातून निर्णायक आंदोलनाच्या तयारीने ते गावातून रवाना झाले आहेत. प्रशासनाने वेळोवेळी फसवणूक केली आहे, त्यामुळे कमान उभी राहत नाही, तोपर्यंत गावात येणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. माणगाव येथे दुपारी तीन वाजता सभा  आयोजित केली  होती.  त्यानंतर मंगळवारी सकाळी तेथूनच मुंबईसाठी चालत रवाना होणार आहेत. 

 प्रशासनाचे आवाहन झिडकारलेआंबेडकरी समाज गाव सोडून जाताना पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, प्रांताधिकारी उत्तम दिघे, गटविकास अधिकारी संध्या जगताप, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलकांनी त्यांची विनंती व आवाहन मान्य केले नाही. माजी उपसरपंच सचिन पाटील, नंदकुमार शिंदे, परशुराम नागरगोजे, मनोज मुंडगनूर, शिवाप्पा आवटी, महेश कणसे, बाळासाहेब शिंदे आदींनीही समजाविण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला.

प्रशासनाने फसविल्याचा आरोपआंदोलकांचे नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी आरोप केला की, प्रशासनाने वेळोवेळी आमची फसवणूक केली. यापुढे कोणाशीही चर्चा करणार नाही. कोणाचीही मध्यस्थी स्वीकारणार नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी समाजाची फसवणूक केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरज