आला रे आला... हापूस आंबा पोस्टात आला! ८५० रुपये डझन, १ एप्रिलपर्यंत नोंदणीची मुदत

By अविनाश कोळी | Published: March 31, 2024 01:13 PM2024-03-31T13:13:47+5:302024-03-31T13:14:20+5:30

१ एप्रिलपर्यंत आंब्याचे बुकिंग केल्यानंतर त्याची डिलिव्हरी ८ एप्रिलला होणार

Alphonso Mango has arrived at the Post Office Rs 850 per dozen booking deadline is 1st April | आला रे आला... हापूस आंबा पोस्टात आला! ८५० रुपये डझन, १ एप्रिलपर्यंत नोंदणीची मुदत

आला रे आला... हापूस आंबा पोस्टात आला! ८५० रुपये डझन, १ एप्रिलपर्यंत नोंदणीची मुदत

अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: अस्सल देवगड हापूस आंबे पोस्टामार्फत देण्याची योजना नुकतीच पोस्टाने जाहीर केली होती. शनिवारी पोस्टाने आंब्याच्या दरासह बुकिंगच्या तारखाही जाहीर केल्या. ८५० रुपये प्रति डझन दर निश्चित करण्यात आला आहे.

सांगलीच्या पोस्टामार्फत ही योजना सुरू झाली आहे. चार ठिकाणी बुकिंगची सोय करण्यात आली आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला अस्सल देवगडचा आंबा ग्राहकांना देण्यात येणार आहे. जीआय मानांकन प्राप्त शेतकऱ्याकडून तसेच नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला हा आंबा असल्याने ग्राहकांनी लगेचच या योजनेबद्दल चौकशी सुरू केली होती. शनिवारी पोस्ट कार्यालयामार्फत आंब्याचा दर व बुकिंगच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. येत्या १ एप्रिलपर्यंतच हा आंबा संबंधित पोस्ट कार्यालयात बुकिंग करता येणार आहे.

  • डिलिव्हरी ८ एप्रिलला मिळणार

१ एप्रिलपर्यंत आंब्याचे बुकिंग केल्यानंतर त्याची डिलिव्हरी ८ एप्रिलला होणार आहे. ज्यांना घरपोच आंबे हवेत त्यांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.

  • या ठिकाणी करा बुकिंग

सांगलीतील मुख्य पोस्ट कार्यालय, सिटी पोस्ट कार्यालय, विलिंग्डन पोस्ट कार्यालय तसेच मिरज मुख्य पोस्ट कार्यालयात बुकिंग करता येईल.

Web Title: Alphonso Mango has arrived at the Post Office Rs 850 per dozen booking deadline is 1st April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.