लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते प्रतीक पाटील यांच्या सहकार्यातून तुंग, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, कवठेपिरान, समडोळी व लाडेगाव या गावात ऑक्सिजन मशीनचे वाटप करण्यात आले.
कारखान्याचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ऑक्सिजन मशीनचे वाटप करण्यात आले. तुंग येथे भास्कर पाटील, सरपंच विमल सूर्यवंशी,उपसरपंच माणिक पाटील, धनाजी पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व आशा सेविका उपस्थित होत्या.
डिग्रजमध्ये उद्योजक भालचंद्र पाटील, उपसरपंच सुरेखा सपकाळ, रावसाहेब पाटील, डॉ. अस्मिता पाटील, डॉ. चेतन सूर्यवंशी, कसबे डिग्रज येथे आनंदराव नलवडे, भरत देशमुख, कुमार लौंढे, उपसरपंच सागर चव्हाण, रामचंद्र मासाळ, डॉ. प्रशांत पुवर, डॉ. मनोज कोळी, कवठेपिरान येथे सचिन पाटील, श्रीबाळ वडगावे, वैद्यकीय अधिकारी युवराज मगदूम, समडोळी येथे बाजार समितीचे माजी सभापती वैभव पाटील, माजी सरपंच सुरगौंडा पाटील, सरपंच विलास आडसूळ, उपसरपंच प्रमोदकुमार ढोले, संजय बेले, आरोग्य सेवक अरुण नांदवडेकर, लाडेगाव येथे जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील, श्रीपती पाटील उपस्थित होते.
जयंत पाटील व प्रतीक पाटील यांच्या सहकार्याने मिळालेल्या ऑक्सिजन मशीनचा कोरोना रुग्णांना निश्चित फायदा होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे, संघटक विनायक मुळीक, दीपक चव्हाण, शशिकांत वायदंडे, किरण खोत आदी उपस्थित होते.