शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीतील सर्व गावे टेंभू योजनेत : भारत पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 23:40 IST

श्रमिक मुक्ती दलाने सातत्याने आंदोलन केल्यामुळे आटपाडी तालुक्यातील सर्व गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबळीराजा स्मृती धरणाचा वर्धापनदिनराज्य संघटक मोहनराव यादव म्हणाले, राज्यातील दुष्काळी भागाला आदर्शवत ठरावे असे बळीराजा धरण आहे

आळसंद : श्रमिक मुक्ती दलाने सातत्याने आंदोलन केल्यामुळे आटपाडी तालुक्यातील सर्व गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यात आला आहे. हे यश चळवळीच्या रेट्यामुळे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

बलवडी-तांदळगाव (ता. खानापूर) येथे बळीराजा जलसंवर्धन विकास संस्थेतर्फे बळीराजा धरणाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, यावेळी पाटणकर बोलत होते. यावेळी राज्य संघटक मोहनराव यादव, दिलीप पाटील, गेल आॅमवेट उपस्थित होते.राज्य संघटक मोहनराव यादव म्हणाले, राज्यातील दुष्काळी भागाला आदर्शवत ठरावे असे बळीराजा धरण आहे. हे धरण म्हणजे परिवर्तनीय चळवळीचा पाया आहे. टेंभू व ताकारी योजनेचे पाणी समन्यायी पध्दतीने देण्याचे धोरण हाती घेणार आहे.

यावेळी दिलीप पाटील, अ‍ॅड. कृष्णा पाटील, आनंदराव पाटील, मारूती शिरतोडे, डॉ. संजय कांबळे, अजित खराडे यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे परशुराम माळी, देवकुमार दुपटे, विलास चव्हाण, दाजी देशमुख, अनिल दुपटे, पांडुरंग चव्हाण, धम्मसागर भारती, दीपक पाटील, उत्तम चव्हाण, राजू राजे, शैलेंद्र दुपटे, सागर गोतपागर, विक्रम चव्हाण, सुरेश चव्हाण उपस्थित होते.मच्छिंद्र पवार यांनी स्वागत केले. रघुनाथ पवार यांनी आभार मानले.डिसेंबरमध्ये पुन्हा आंदोलनडॉ. पाटणकर म्हणाले, आटपाडीला बंद पाईपलाईनद्वारे टेंभू योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. तो पॅटर्न राज्यभर स्वीकारावा, यासाठी डिसेंबरमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :water transportजलवाहतूकDamधरण