शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

अमृत योजनेच्या ठेक्यामागे सर्वपक्षीय हात

By admin | Updated: July 15, 2017 23:53 IST

अमित शिंदे : बेकायदेशीर मंजुरीविरोधात लढा उभारणार

लोकमत न्यूज नेटवर्क  --सांगली : महापालिकेने मंजूर केलेल्या अमृत योजनेतील मिरज पाणीपुरवठ्याच्या ठेक्यामागे सर्वपक्षीय हात असून, याविरोधात आम्ही लढा उभारणार आहोत, अशी माहिती सांगली जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. शिंदे म्हणाले की, भाजपने या योजनेच्या माध्यमातून ‘सबका साथ, सबका विकास’ हे ब्रीद खरे करून दाखविले आहे. सर्वांनाच त्यांनी योजनेच्या मंजुरीत सोबतीला घेतले आहे. ही योजना नागरिकांच्या कल्याणासाठी आहे की, नगरसेवकांच्या दुकानदारीसाठी आहे, याचा खुलासा शासनाने करावा. कारण नियमबाह्यरित्या जादा दराने आलेल्या निविदेवर शासनानेच शिक्कामोर्तब केले आहे. स्थानिक आमदार आणि खासदारही याबाबत मौन बाळगून आहेत. विरोधी पक्षाचीसुद्धा त्याला साथ आहे. त्यामुळे हा एक सर्वपक्षीय घोटाळा असल्याचेच दिसत आहे. नियमबाह्य कामात झालेला सर्वपक्षीय सहभागच संशयाला बळ देत आहे. योजनेतून नागरिकांचे कल्याणच होणार नाही. आर्किटेक्ट चव्हाण म्हणाले की, जादा दराने निविदा मंजूर केली असेल तर, कामाचे मूळ अंदाजपत्रक चुकले होते का, याचा खुलासा झाला पाहिजे. योजनेवर अवाढव्य खर्च करताना पाणीपट्टी किती लावण्यात येणार, त्याचा भुर्दंड नागरिकांना बसणार का किंवा कोणत्या आर्थिक गणितावर ही योजना कार्यान्वित होणार, याबाबत कोणताही खुलासा महापालिकेकडून झालेला नाही. जादा दराने निविदा दाखल करताना संबंधित ठेकेदाराने रेट अनालेसिस (दर विश्लेषण) दिले पाहिजे. ते दिलेले नाही. त्यामुळे निश्चितच यामागे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, हे दिसून येते. यावेळी प्रा. आर. बी. शिंदे, जयंत जाधव, तानाजी रुईकर, आसिफ मुजावर, नितीन मोरे, रवींद्र ढोबळे, अंकुर तारळेकर, सागर शिंदे, धीरज पोळ, मुकुंद भोरे, कौस्तुभ पोळ, अरुणा शिंदे, प्रा. राणी यादव आदी उपस्थित होते.खाबूगिरी पॅटर्नमुळे राज्यभर बदनामीआजवर मिरजेसाठी सर्वच योजना जादा दराने मंजूर झाल्या आहेत. तरीही येथील कामांचा दर्जा निकृष्टच राहिला आहे. महापालिकेच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपयांचा निधी मिरजेतील विविध विकासकामांवर खर्च होऊनही मिरजेत सर्वप्रकारचे प्रश्न आजही गंभीर अवस्थेत ठाण मांडून आहेत. मिरजेचे नाव नगरसेवकांच्या खाबूगिरी पॅटर्नमुळे बदनाम झाले आहे. परिणामी तिन्ही शहरांच्या बदनामीची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू आहे. जनतेला सोबत घेऊन आम्ही याविरोधात लढा पुकारणार आहोत. सर्वप्रकारची आयुधे यासाठी वापरण्याची तयारी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत अशाप्रकारची बेकायदेशीर कामे आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा अ‍ॅड. शिंदे यांनी यावेळी दिला.