शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीबाबत माहिती एका क्लिकवर सांगलीत प्रशिक्षण : ट्रू व्होटर अ‍ॅपबद्दल इच्छुकांना धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:26 IST

सांगली : महापालिकेच्या नव्या सभागृहात जाऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांसह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ट्रू व्होटर अ‍ॅपचे प्रशिक्षण दिले.

सांगली : महापालिकेच्या नव्या सभागृहात जाऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांसह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ट्रू व्होटर अ‍ॅपचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणास मोठा प्रतिसाद मिळाला.

निवडणूक प्रक्रियेची मतदार, अधिकारी आणि उमेदवार यांना माहिती व्हावी, यासाठी आयोगाने ट्रू व्होटर हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपचे प्रशिक्षण सोमवारी महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात झाले. आयोगाचे अप्पर सचिव नि. ज. वागले, उपायुक्त अविनाश सणस, कक्ष अधिकारी अतुल जाधव उपस्थित होते.या अ‍ॅपबाबत आयोगाचे अधिकारी मुरलीधर भुथडा यांनी माहिती दिली. पहिल्या सत्रात महापालिकेचे अधिकारी व कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले, तर दुसºया सत्रात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती दिली गेली.

या अ‍ॅपवर नोंदणी कशी करावी, त्याची कार्यप्रणाली काय आहे, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अ‍ॅपद्वारे मतदार व इच्छुक उमेदवारांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा उमेदवाराला सर्व मतदारांपर्यंत पोहोचता येत नाही. तसेच मतदाराला त्याच्या समस्याही उमेदवारांना सांगता येत नाहीत. ट्रू व्होटर अ‍ॅपद्वारे इच्छुक उमेदवार सर्व मतदारांपर्यंत आपला अजेंडा पोहोचवू शकतो. तसेच मतदार व्हाईस कॉलद्वारे त्याच्या भागातील समस्या उमेदवारांना सांगू शकतो, अशी व्यवस्था केली आहे. एकाच क्लिकवर प्रभागाची मतदार यादी उपलब्ध होणार आहे.

उमेदवाराचा निवडणूक खर्च, आयोगाच्या विविध आदेशापासून ते अगदी निकालापर्यंतची सर्व माहिती या अ‍ॅपवर उपलब्ध असेल, असे भुथडा यांनी सांगितले.यावेळी आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त सुनील पवार व स्मृती पाटील, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, सहाय्यक आयुक्त एस. व्ही. पाटील, जनसंपर्क अधिकारी डी. व्ही. हर्षद उपस्थित होते.प्ले स्टोअरवर उपलब्धराज्य निवडणूक आयोगाचे ट्रू व्होटर हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. तेथून ते डाऊनलोड करता येऊ शकते. डाऊनलोड केल्यानंतर मतदारांना नोंदणी करावी लागेल. त्यानंतर अ‍ॅपवर सर्व माहिती उपलब्ध होईल. हे अ‍ॅप इतर सोशल मीडियाप्रमाणे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असावे, ते कधीच डिलिट केले जाऊ नये, अशी आयोगाची इच्छा आहे. त्यादृष्टीने अ‍ॅप तयार करण्यात आल्याचेही भुथडा म्हणाले.आचारसंहिता भंगावरही वॉचनिवडणुकीत आचारसंहिता भंग करण्याच्या प्रकारावरही ट्रू व्होटर अ‍ॅपद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. मतदारांना आमिष, पैसे वाटप अशा गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी या अ‍ॅपचा वापर होणार आहे. मतदारांनी या अ‍ॅपवर आचारसंहिता भंगाची तक्रार करावी. ही तक्रार महापालिका अधिकारी व पोलीस अधिकाºयांकडे जाईल. त्यामुळे तातडीने कारवाई करणेही सोयीचे ठरणार असल्याचे आयोगाच्या अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक