शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Sangli: ऑल इंडिया चॅम्पियन संभाजी पाटील-सावर्डेकर यांचे निधन

By घनशाम नवाथे | Updated: April 26, 2025 17:32 IST

सांगली : कुस्तीमध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन तसेच शिक्षण, क्रीडा, कला, सांस्कृतिक, कृषी, सहकार क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी ओळख ...

सांगली : कुस्तीमध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन तसेच शिक्षण, क्रीडा, कला, सांस्कृतिक, कृषी, सहकार क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले मराठा समाजचे विद्यमान अध्यक्ष ॲड. पै. संभाजी गोविंद पाटील-सावर्डेकर (वय ७८) यांचे आज, शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.मुळ सावर्डे (ता. तासगाव) येथील सावर्डेकर कुटुंबाची कुस्तीमध्ये देशभर ओळख आहे. भारतभीम ज्योतीरामदादा सावर्डेकर, मल्लसम्राट विष्णूपंत सावर्डेकर यांचा कुस्ती क्षेत्रातील घराण्याचा वारसा संभाजी पाटील-सावर्डेकर यांनी समर्थपणे चालवला. दोन चुलत्यांच्या कडक शिस्तीत संभाजी सावर्डेकर यांनी कुस्तीचे धडे गिरवले. शिवाजी विद्यापीठ, इंटर युनिव्हर्सिटी बोर्ड, इंडिया कुस्ती विभाग, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन, महान भारत केसरी अशा वेगवेगळ्या कुस्ती स्पर्धेत त्यांनी प्रतिनिधीत्व केले. १९७० मध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठास ऑल इंडिया चॅम्पियनशीप मिळवून दिली. कुमार भारत केसरी स्पर्धेत आशियायी सुवर्णपदक विजेता कर्तारसिंगशी टक्कर देत लक्ष वेधून घेतले. दिग्गज नेते यशवंतराव चव्हाण व संजय गांधी यांनी त्यांचे कौतुक केले होते. सलग दोनवेळा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनात महाराष्ट्र चॅम्पियन सन्मानासह मिळवले. कुस्ती क्षेत्रासह वकीलीत आणि मराठी चित्रपटातून अभिनेते म्हणूनही छाप पाडली होती.संभाजी सावर्डेकर यांनी हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, कर्नाटक केसरीसह अनेक राष्ट्रीयस्तरावर कामगिरी करणारे मल्ल घडवले. भोसले व्यायाम शाळेचा सर्वत्र दबदबा निर्माण केला. वसंतदादा कारखान्याचे उपाध्यक्ष, सहकार बाेर्डचे संचालक, वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विश्वस्त म्हणूनही कार्य केले. सावर्डे (ता. तासगाव) गावातही विविध कामातून ठसा उमटवला. अलिकडेच डिसेंबर २०२४ मध्ये त्यांची मराठा समाज संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. कुस्तीक्षेत्रासाठी त्यांनी वाहून घेतले होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी खासदार संजय पाटील यांचे मामा होत.

टॅग्स :Sangliसांगली