शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व अतिक्रमणे हटविणार; दहा दिवसांत यादी करा, आयुक्त सत्यम गांधी यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:54 IST

शिक्षणात राजकीय दबाव चालू देणार नाही

सांगली : कोणत्याही परिस्थितीत महापालिका क्षेत्रात अतिक्रमणे खपवून घेणार नाही. येत्या दहा दिवसांत अशा अतिक्रमणांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. यादी प्राप्त होताच युद्धपातळीवर अतिक्रमणे हटविली जातील, असा इशारा सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सत्यम गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.ते म्हणाले, महापालिका क्षेत्राला अतिक्रमणमूक्त केले जाईल. नाले, ओतात जी अतिक्रमणे असतील त्यांचीही माहिती घेऊ. महापुराला अशा अतिक्रमणांमुळे निमंत्रण मिळत असेल तर त्यावरही तातडीने कारवाई केली जाईल. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणत्याही नागरिकाची तक्रार बेदखल होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल.एकाच व्यक्तीला एका समस्येसाठी पुन्हा महापालिकेत यावे लागणार नाही. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी केली जाईल. नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते दिले जातील. सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे लागेल. त्यासाठी करसंकलनात मोठी सुधारणा अपेक्षित आहे. घरपट्टी, पाणीपट्टीची वसुली सध्या समाधानकारक नाही. त्यावर आम्ही काम करू.

ड्रेनेज योजनेची माहिती घेणारगांधी म्हणाले, महापालिका क्षेत्रातील ड्रेनेज योजना कोणत्या कारणास्तव रेंगाळली आहे, याची माहिती घेण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेच्या योजना निर्धारित वेळेत पूर्ण व्हावेत, अशी अपेक्षा आहे.

शिक्षणात राजकीय दबाव चालू देणार नाहीमहापालिका शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. वर्षभरात निश्चित चांगले बदल दिसून येतील. शिक्षणाच्या बाबतीत कोणी राजकारण आणत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा गांधी यांनी दिला.

शहरातील हिरवाई वाढविणारगांधी म्हणाले, सध्या महापालिका क्षेत्रातील हिरवाई (ग्रीन कव्हर) ७ टक्के आहे. तो वाढविण्यासाठी आम्ही कार्यक्रम हाती घेणार आहोत. त्याचबरोबर महापालिकेच्या उद्यानांमध्ये जादा सुविधा देऊन त्यांचा विकास केला जाईल.

आपत्ती व्यवस्थापनाबाबत काम करणारमहापालिका क्षेत्राला महापुराचा नेहमीच त्रास होतो. त्यामुळे जागतिक बँकेच्या सहकार्याने आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प शासनाकडे सादर केला आहे. त्याचा पाठपुरावा करून एक चांगले काम यामध्ये उभे करू, असे गांधी म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीcommissionerआयुक्त