शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

‘मातोश्री’वरून आले सतर्कतेचे आदेश....स्वतंत्र लढण्याची मानसिकता ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 16:49 IST

महायुतीसाठी अजूनही वाटाघाटी सुरू असल्या तरी युती तुटण्याचीही भीती व्यक्त होऊ लागल्याने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा, सावध रहा, गाफिल राहू नका, असे संदेश राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.

ठळक मुद्दे‘मातोश्री’वरून आले सतर्कतेचे आदेशस्वतंत्र लढण्याची मानसिकता ठेवा!

सांगली : महायुतीसाठी अजूनही वाटाघाटी सुरू असल्या तरी युती तुटण्याचीही भीती व्यक्त होऊ लागल्याने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा, सावध रहा, गाफिल राहू नका, असे संदेश राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.

सांगलीत बुधवारी शिवसेनेचे वरिष्ठ नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मेळाव्यातच प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी करण्याचे आवाहन केले. त्यामुळे शिवसेना नेते युती तुटण्याच्या शक्यतेमुळे सतर्कतेचा संदेश देऊ लागले आहेत.विधानसभेच्या २0१४ च्या निवडणुकीतही ऐनवेळी चर्चा होऊन युती तुटली होती. त्यावेळी शिवसेना गाफिल राहिल्याने राज्यातील अनेक जागा त्यांना गमवाव्या लागल्या होत्या. मागचा अनुभव गाठीशी असल्याने काहीही होऊ शकते, असाही संदेश नेते देत आहेत. सर्व जागांवर निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी.

युती झालीच तर त्याचा उपयोग युतीच्या उमेदवारांना होऊ शकतो, मात्र गाफिल राहिल्यानंतर युती तुटली तर नुकसान होऊ शकते, याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच राज्यभर विविध नेते त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बातचीत करीत असल्याचे समजते.बंडखोरीचीही चिंतायुती झाली तरीही भाजपकडून स्थानिक पातळीवर बंडखोरी करून सेनेच्या काही जागा ताब्यात घेतल्या जाण्याची भिती शिवसेना नेत्यांना आहे. सांगली जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या काही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी जोरदार तयारी केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी असे चित्र दिसत असल्याने त्याचीही नोंद वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणSangliसांगली