लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार, नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी असे अनेक सण एकापाठोपाठ एक येतात. प्रत्येक दिवशी वेगळे व्रत आणि वेगळी पूजा असते. सणासुदीच्या या महिन्यात साखरेच्या दरात हलकीशी वाढ झाली आहे. साखरेची मागणी वाढल्याने दरवाढ अपेक्षित होती. त्यामुळे सणासुदीचा गोडवा काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे.
चौकट
का वाढले भाव
- श्रावण महिन्यात अनेक सण येतात. त्यामुळे साखरेची मागणी वाढलेली असते. त्याचा परिणाम साखरेच्या दरावरही होतो. सध्या साखरेच्या दरात रुपया ते दोन रुपयांनी वाढ झाली आहे. - निकेश गिडवाणी
- दरवर्षी सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढते. त्यात जिल्ह्यातच साखरेचे उत्पादन होत असल्याने वाहतूक व इतर खर्च वाचतो. सध्या साखरेच्या दरात फारशी वाढ झालेली नाही. किरकोळ विक्रेत्यांनी एक ते दोन रुपयांची वाढ केली आहे. - मनीष कोठारी
चौकट
महिन्याचे बजेट वाढले
- आधीच महागाईने स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे. खाद्यतेल, गॅस, भाजीपाल्याचे दर भडकले आहेत. त्यात आता साखरेची भर पडली आहे. सणासुदीच्या काळात साखर जास्तीची लागते. दर वाढल्याने सणाला गोडधोड करण्यावर मर्यादा आली आहे. - सुमन पाटील
- श्रावण महिन्यात विविध सणांच्या निमित्ताने घरी पै-पाहुण्यांची ये-जा सुरू असते. त्यांच्यासाठी गोडधोड करावे लागते. आधीच खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. कोरोना, लाॅकडाऊनमुळे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात साखरेचीच्या दरवाढीने संकटात भरच टाकली आहे. - विशाखा कदम
चौकट
साखरेचे दर (प्रतिकिलो)
जानेवारी : ३४
फेब्रुवारी : ३४
मार्च : ३४
एप्रिल : ३५
मे : ३५
जून : ३५
जुलै : ३६
ऑगस्ट : ३६
चौकट
जिल्ह्याला दररोज लागते साखर : १००० क्विंटल
श्रावण महिन्यात मागणी वाढली : २०० क्विंटल