लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ‘अहिल्यादेवी होळकर यांनी प्रजेसाठी असलेल्या निष्ठेने सारी कौटुंबिक दु:खे बाजूला सारत उत्तम राज्यकारभार केला. परमेश्वरावरील अगाध भक्तीमुळे अनेक ठिकाणी घाट, मंदिरे, धर्मशाळा उभारून सर्वसामान्य जनतेला आधार दिला. या कार्यामुळेच त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात घर केले आहे, असे प्रतिपादन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त येथील भाजप कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. विजयनगर येथील राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, महिला मोर्चा अध्यक्ष स्वाती शिंदे, नगरसेवक संजय यमगर, विष्णू माने, राजू कुंभार, गजानन आलदर, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, कल्पना कोळेकर, भूपाल उर्फ बंडू सरगर, सविता मदने, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर, दरीबा बंडगर, संतोष सरगर, श्रीकांत वाघमोडे, अमित गडदे, रघुनाथ सरगर, गणपत साळुंखे, विशाल मोरे उपस्थित होते.