शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: मतदारांच्या बोटावर शाई नव्हे, उमटणार मार्करची खूण, निवडणूक आयोगाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:15 IST

सांगलीत ५८२ पेनची तयारी

सांगली : निवडणुकीत मतदान केल्यानंतर, मतदाराच्या बोटावर शाई लावली जाते, दुबार मतदार होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते. शाई लावण्याऐवजी मार्कर पेनने खूण करण्यात येणार आहे. मतदारांची संख्या आणि गरज लक्षात घेऊन सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने एकूण ५८२ मार्कर पेन उपलब्ध करून दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.उरुण-ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत नगरपरिषद आणि शिराळा, आटपाडी नगरपंचायतीसाठी दि. २ डिसेंबरला मतदान होत आहे. या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान यंत्रासह अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या कार्यक्षेत्रात २ डिसेंबरला मतदान होणार असून त्यासाठी २९१ मतदान केंद्रे केली आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मार्कर पेन उपलब्ध करून देण्यात येतील, ज्याद्वारे मतदान कर्मचारी मतदाराच्या बोटावर चिन्हांकित करतील.

२,५७,९७७ मतदार मतदानाचा हक्क बजावणारसहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीच्या क्षेत्रातील १८९ जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, ज्यामध्ये अध्यक्षपदाचाही समावेश आहे. या निवडणुकीत दोन लाख ५७ हजार ९७७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये उरुण-ईश्वरपूर नगरपरिषदेसाठी ६४ हजार २१५, विटा ४६ हजार ३३२, आष्टा ३० हजार ५७३, तासगाव ३२ हजार ९९४, जत २८ हजार ९०, पलूस २२ हजार ६७, शिराळा नगरपंचायतीसाठी १३ हजार ९५, आटपाडी २० हजार ६११ मतदारांचा समावेश आहे. हे मतदार शहराचा भावी नगराध्यक्ष आणि नगसेवक निवडणार आहेत.

अशी आहेत मतदान केंद्रेपालिका / मतदान केंद्र संख्याउरुण-ईश्वरपूर / ६७विटा / ४९आष्टा / ३७तासगाव / ३६जत / ३४पलूस / २६शिराळा / १७आटपाडी / २५एकूण / २९१

निवडणुकीत मतदान केल्यानंतर, मतदाराच्या बोटावर शाई लावली जाते, दुबार मतदार होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते. पण, सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीत शाईऐवजी मार्कर पेनने खूण करण्यात येणार आहे. - डॉ.पवन म्हेत्रे, प्रभारी सहायक आयुक्त, नगरपरिषद प्रशासन शाखा.

English
हिंदी सारांश
Web Title : Marker, Not Ink, for Voters in Local Body Polls

Web Summary : Local body elections will use markers instead of ink to mark voters' fingers, preventing duplicate voting. 582 marker pens are provided for the upcoming polls across six Nagar Parishad and two Nagar Panchayat areas.