शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय दबावानंतर बाजार समित्यांच्या करातील कपात रद्द

By अशोक डोंबाळे | Updated: October 15, 2024 20:58 IST

राज्य शासनाचा निर्णय : पूर्वीप्रमाणेच ७५ ते १०० पैसे कराची आकारणी.

अशोक डोंबाळे/सांगली

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : बाजार समित्यांच्या आवारात येणाऱ्या आणि व्यवहार होणाऱ्या मालावर कराची आकारणी होत होती. बाजार समित्यांकडून घेण्यात येणाऱ्या करामध्ये राज्य शासनाच्या पणन विभागाने सोमवारी ५० टक्के कपात केली होती. पणन सचिवांच्या अधिसूचनेनंतर राज्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. राज्यकर्त्यांच्या दबावापुढे अखेर उपसचिवांचा निर्णय मंगळवारी रद्द करून पूर्वीप्रमाणेच शेकडा ७५ ते १०० पैसे कराची आकारणी होणार आहे.

अन्नधान्यावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केला आहे. त्यामुळे बाजार समितीकडून आकारण्यात येणारा नियमन कर (सेस) रद्द करण्यात यावा. जीएसटी कायदा सुटसुटीत करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील व्यापाऱ्यांनी २७ ऑगस्ट रोजी बाजारपेठा बंद ठेवण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीकडून दिला होता. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने मागण्यावर चर्चा करण्यासाठी समिती गठित केली होती. त्यानुसार राज्य शासनाने बाजार समित्यांच्या करामध्ये ५० टक्क्यांची कपात केली होती. पूर्वी १०० रुपयाला ७५ पैसे ते एक रुपयांचा कर आकारला होतो. शासनाच्या सोमवारच्या अधिसूचनेनुसार १०० रुपयाला २५ ते ५० पैसेप्रमाणे कराची आकारणी बाजार समित्यांना करावी लागणार होती. पण, पणन उपसचिवांच्या या निर्णयाविरोधात राज्यकर्त्यांकडून विरोध झाल्यामुळे दुसऱ्याच दिवशी सोमवारची अधिसूचना रद्द करून मंगळवारी नवीन अधिसूचना निघाली. यामध्ये पूर्वीप्रमाणेच ७५ ते १०० पैसे कराची आकारणी होईल, असे म्हटले आहे. व्यापाऱ्यांमध्ये नाराजी : अमरसिंह देसाईराज्यातील व्यापाऱ्यांनी जीएसटी लागू करून बाजार समित्यांचा कर रद्द करावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने बाजार समित्यांच्या करात ५० टक्के कपात करून २५ ते ५० पैसे कर आकारणी करण्याची अधिसूचना सोमवारी प्रसिद्ध झाली होती. लगेच तो निर्णय दुसऱ्याच दिवशी रद्द करून राज्य सरकारने व्यापाऱ्यांवर अन्याय केला आहे, अशी प्रतिक्रिया सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगली