शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

तब्बल वर्षानंतर गाईच्या दुधास अच्छे दिन- अनुदानाविना दर : प्रतिलिटर दूध २५ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 18:41 IST

‘ना नफा... निव्वळ तोटा’ या तत्त्वावर गेल्या वर्षभरापासून तग धरून थांबलेल्या दूध उत्पादकांना दरवाढीचा दिलासा मिळाला आहे. १ जूनपासून सर्व दूध संघांनी गाईच्या दुधास ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी २५ रुपये दर निश्चित केला आहे.

ठळक मुद्देपण दूध दरात होत असलेली वाढ धवलक्रांती वाचविण्यासाठी व दूध उत्पादकांसाठी तारक ठरणार आहे.

अतुल जाधव

देवराष्ट्रे : ‘ना नफा... निव्वळ तोटा’ या तत्त्वावर गेल्या वर्षभरापासून तग धरून थांबलेल्या दूध उत्पादकांना दरवाढीचा दिलासा मिळाला आहे. १ जूनपासून सर्व दूध संघांनी गाईच्या दुधास ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी २५ रुपये दर निश्चित केला आहे. हा दर शासनाच्या कोणत्याही अनुदानाशिवाय शेतकऱ्यांना मिळणार असल्याने एक वर्षानंतर गाय दूध उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत.

पाऊस कमी झाल्याने यावर्षी शेती उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दूध व्यवसायाने तारले होते; पण गेल्या वर्षभरापासून दूध दर पडल्याने शेतीला जोडधंदा असणाºया दूध व्यवसायाला व उत्पादन करणाºया शेतकºयांना तोटा सहन करावा लागला होता. दूध धवलक्रांतीचे अर्थकारण बिघडून ऐन उन्हाळ्यात शेतकºयांची होरपळ होत होती. तेव्हा म्हैस व गाईच्या दूध उत्पादकांना दूध संघांनी दिलासा देत ११ मे पासून दूधदरात वाढ केली होती.

गाय दूधदरात प्रतिलिटर एक रुपयांनी, तर म्हैस दूधदरात प्रतिलिटर १.३० रुपयांची वाढ केली होती. तेव्हापासून दुधाचे अर्थकारण सुधारत चालले आहे. आता गाय उत्पादकांना ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर २५ दर मिळणार आहे. ही दरवाढ १ जूनपासूनच्या दूध बिलाबरोबर मिळणार आहे. तसेच एसएनएफमधील फरकही कमी केल्याने प्रतिलिटर ६० पैसे फरक जादा मिळणार आहे, म्हणजेच उत्पादकांना नवीन दरवाढ २.६० रुपयांची मिळणार आहे.शेतकºयांना आधारदुष्काळाने चाºयाबरोबर पशुखाद्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सरकी, गोळी पेंडीचा सरासरी दर २५ ते ३० रुपये किलो झाला आहे. बाजारात पशुखाद्यात असणारी तेजी, गुरांचे आजारपण, वातावरणाचा होणारा परिणाम आदी कारणांमुळे उत्पादक अडचणीत सापडला होता; पण दूध दरात होत असलेली वाढ धवलक्रांती वाचविण्यासाठी व दूध उत्पादकांसाठी तारक ठरणार आहे.अनुदान मिळाले तर...वाढलेल्या दूध दरात जर शासनाने ५ रुपये अनुदानाची भर घातली, तर गाय दूध दर ३० रुपयांपर्यंत जाईल व दूध उत्पादक वर्षभर झालेल्या तोट्यातून सावरेल व दूधदराचा उच्चांक नोंदवला जाईल.

 

टॅग्स :Sangliसांगलीmilkदूध