शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन सात-बारा उताऱ्याअभावी हमीभाव खरेदी केंद्रे आॅफलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:27 IST

राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन, मूग व उडीद हमीभाव खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देशेतकºयांची पिळवणूक : सोयाबीन, मूग, उडीद खरेदी केंद्रांना मुहूर्त नाहीचपणन विभागाच्या अधिकाºयांनी आदेशाचा दाखला देत केले ‘हात’ वर

शरद जाधव -सांगली : राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन, मूग व उडीद हमीभाव खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात आले होते. मात्र, शेतीमालाची नोंदणी करताना आॅनलाईन सात-बारा उतारा सक्तीचा केला जात असल्याने व सर्व्हरच्या अडचणीमुळे संगणकीकृत सात-बारा उतारा मिळत नसल्याने शेतकºयांच्या अडचणी वाढल्या आहेत. यासंदर्भात शेतकºयांनी बाजार समितीकडे तक्रार केली असून, अद्यापही ही केंद्रे सुरू झालेली नसल्याने शेतकºयांची अस्वस्थता वाढली आहे.

सोयाबीन, उडीद व मुगास हमीभावाप्रमाणे दर मिळत नसल्यामुळे बाजार समितीकडे शेतकºयांनी तक्रारी केल्या होत्या. गेल्या आठवड्यापर्यंत सोयाबीनला फक्त हमीभावापेक्षा जादा दर मिळत होता. आता त्या दरातही घट झाली असून सोयाबीनसह उडीद आणि मुगालाही हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. शेतकºयांना हमीभाव मिळावा यासाठी मार्केट यार्डात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी बाजार समितीने जिल्हाधिकाºयांकडे केली होती. त्यानुसार १ ते १० आॅक्टोबरपर्यंत नोंदणी सुरू करण्यात येणार होती.

शेतकºयांकडून शेतीमालाची नोंदणी करताना आॅनलाईन सात-बारा अनिवार्य करण्यात आला आहे. राज्याच्या सर्व्हरच्या अडचणीमुळे आॅनलाईन पध्दतीने उतारा मिळण्यात अडचणी येत आहेत. शेतकºयांची अडचण लक्षात घेता, शेतकºयांची अडवणूक करू नये, असे आदेश जिल्हाधिकाºयांनीही दिले आहेत. तरीही नोंदणीसाठी आॅनलाईन सात-बारा उतारा सक्तीचा केला आहे.

याबाबत शेतकºयांनी बाजार समितीकडे तक्रार केली असता, नोंदणी करताना आॅनलाईन सात-बारा उतारा घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून सूचना असल्याचे ‘पणन’च्या अधिकाºयांनी सांगितले.

बाजार समिती करणार पाठपुरावाहमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब लागत असल्याने शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढत असल्याने, आता बाजार समितीने हा तिढा सोडविण्यात पुढाकार घेतला आहे. संगणकीकृत सात-बारा उताºयाची सक्ती करू नये, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सभापती दिनकर पाटील व सचिव एन. एम. हुल्याळकर यांनी सांगितले.

नोंदणीस मुदतवाढ, तरीही तिढा कायमउडीद, मूग व सोयाबीनची आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी २४ आॅक्टोबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. मात्र, याची कल्पना शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे मुदतवाढीची माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचविण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने बुधवार, दि. १० आॅक्टोबरला दिले आहेत. मुदतवाढ मिळाली असली तरी, आॅनलाईन सात-बारा अनिवार्य करण्यात आल्याने नोंदणीचा तिढा कायम राहणार आहे.

टॅग्स :MONEYपैसाSangliसांगली