शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एक गाव, एक गणपतीसाठी प्रशासनाचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 16:42 IST

वर्षभर प्रतीक्षा असलेल्या गणरायाच्या आगमनास अवघा आठवडाभराचा कालावधी उरला असताना, यंदा कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने गावोगावी बैठका घेऊन यंदा एक गाव, एक गणपती उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देएक गाव, एक गणपतीसाठी प्रशासनाचे प्रयत्न जिल्ह्यात २५० हून अधिक गावांत उपक्रम

सांगली : वर्षभर प्रतीक्षा असलेल्या गणरायाच्या आगमनास अवघा आठवडाभराचा कालावधी उरला असताना, यंदा कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने गावोगावी बैठका घेऊन यंदा एक गाव, एक गणपती उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. काही गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजराच न करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा दरवर्षीपेक्षा जादा गावात एक गाव, एक गणपती उपक्रम राबविला जाणार आहे.कोरोनाचा वाढता कहर आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत बनले आहे. त्यात शासनाने सार्वजनिक उत्सवावर बंदी घातल्याने अनेक ठिकाणी यंदाच्या गणेशोत्सवाला घरगुती स्वरूप प्राप्त झाले आहे.

दरवर्षी गणेशचतुर्थीच्या अगोदर पंधरवड्यापासून पोलीस प्रशासनाकडून नियोजन केले जाते. यात शांतता कमिटी, दक्षता कमिट्यांच्या बैठका घेत, गावात एकच सार्वजनिक गणपती बसविण्याचे आवाहन केले जाते. दरवर्षी जिल्ह्यात २५० हून अधिक गावांत हा उपक्रम राबविला जातो.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवSangliसांगली