अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांना मिरज व कुपवाड या शहरांचा कार्यभार घेतला आहे. लांघी मिरज कार्यालयात आल्यानंतर त्यांना कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते वरच्या मजल्यावरील सभागृहापर्यंत सर्वत्र अस्वच्छता दिसून आली. लांघी यांनी प्रत्येक विभागात जाऊन पाहणी केली. तेथील अस्ताव्यस्त फायली, छताची जळमटे, काचांवर पडलेले डाग, कोपऱ्यांतील पिचकाऱ्या, घाणीचे साम्राज्य पाहून संतप्त झाले. मिरज कार्यालयात कामकाज सुरू करण्यापूर्वी कार्यालयातील प्रत्येक विभाग व संपूर्ण इमारतीच्या स्वच्छतेचे आदेश त्यांनी दिले. यामुळे दोन दिवस मिरज कार्यालयातील प्रत्येक विभागातील कर्मचारी आपल्या विभागात स्वच्छतेसाठी धावपळ उडाली होती. अतिरिक्त आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेल्या पहिल्याच दणक्याने मिरज कार्यालयाची साफसफाई झाली. याबाबत नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. नूतन अतिरिक्त आयुक्तांनी मिरजेतील महापालिकेचा कारभारही स्वच्छ होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीही नागरिकांची मागणी केली.
मिरजेचा कार्यभार स्वीकारताच अतिरिक्त आयुक्तांकडून झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:30 IST