शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत हॉटेल व्यावसायिकाचा मेहुण्यांकडून खून, कौटुंबिक कारणातून कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:09 IST

शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील पाकीजा मशिदीमागे हॉटेल व्यावसायिकाचा दोघा मेहुण्यांनी चाकूने हल्ला करून खून केला. ही घटना मंगळवारी रात्री एकच्या सुमारास घडली. जमीर रफिक पठाण (वय ५५, रा. पेण, पनवेल) असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देदोघांवर गुन्हा : संशयित फरारी

सांगली : शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील पाकीजा मशिदीमागे हॉटेल व्यावसायिकाचा दोघा मेहुण्यांनी चाकूने हल्ला करून खून केला. ही घटना मंगळवारी रात्री एकच्या सुमारास घडली. जमीर रफिक पठाण (वय ५५, रा. पेण, पनवेल) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी खूनप्रकरणी जमीर यांच्या दोन मेहुण्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, दोघेही फरारी आहेत. कौटुंबिक कारणावरून हा खून झाल्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी सांगितले.

आलीम सलीम पठाण (३०) व शाहरुख सलीम पठाण (२७, रा. पाकीजा मशिदीमागे, अल्अमीन शाळेजवळ, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. मृत जमीर यांचा मुलगा युसूफ पठाण याने सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

जमीर यांचा पेण येथे हॉटेलचा व्यवसाय आहे. ते कुटुंबासह पनवेलला राहत होते. पंधरा दिवसांपूर्वी ते मेहुणीच्या लग्नासाठी कुटुंबासह सांगलीत आले होते. संशयित आलीम व शाहरुख यांच्या घराशेजारीच ते राहत होते. आलीम रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. मिरजेतील एका कॅरम क्लबमध्ये झालेल्या खुनाचा गुन्हा त्याच्यावर दाखल होता. त्यात त्याला अटकही झाली होती. तो कारागृहात असताना त्याच्या मुलाचा सांभाळ बहिणीने म्हणजे मृत जमीर यांच्या पत्नीने केला होता. या खुनातून तो निर्दोष सुटला होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याचा मुलगा आलीमजवळ जात नव्हता. तो आलीमच्या बहिणीकडेच राहत होता. याचा त्याला राग होता. मुलगा आपल्याकडे का येत नाही, यातून त्याचा बहिणीशी यापूर्वीही वरचेवर वाद झाला होता.मंगळवारी रात्री एकच्या सुमारास याच कारणावरून त्याचा जमीर यांच्याशी वाद झाला. जमीर यांनी त्याला ‘रात्री कशाला वाद घातलोत, सकाळी बघू’ असे समजावूनही सांगितले. पण हा वाद वाढत गेला. इतर नातेवाईकांनी हा वाद थांबविण्याचाही प्रयत्न केला. यावेळी संशयित आलीमचा भाऊ शाहरूखही तिथे होता. आलीम याने चाकूने जमीर यांच्यावर हल्ला केला.

जमीर यांचा मुलगा युसूफ याने आलीमला अडविण्याचा प्रयत्न केला. चाकूचा वार जमीर यांच्या छातीवर बसला. ते जमिनीवर कोसळले. नातेवाईकांनी त्यांना मोटारसायकलवरून सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचार सुरू असताना पहाटे तीनच्या सुमारास जमीर यांचे निधन झाले. हल्ल्यानंतर हल्लेखोर आलीम व त्याचा भाऊ शाहरुख या दोघांनी पलायन केले.या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनीही पाहणी केली. बुधवारी सकाळी जमीर यांचा मुलगा युसूफ याने सांगली शहर पोलीस ठाण्यात आलीम व शाहरुख पठाण या दोघांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.मदतगाराचाच खूनमुख्य संशयित आलीम पठाण याच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात काही वर्षांपूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यात त्याला अटक झाली होती. तो कारागृहात असताना जमीर पठाण यांनी त्याला सर्व ती मदत केली होती. कारागृहातही ते त्याला मनीआॅर्डरद्वारे पैसे पाठवित होते. खुनाच्या गुन्'ातून निर्दोष सुटल्यानंतरही जमीर यांनी आलीम याला हॉटेलमध्ये काम दिले होते. मात्र आलीमने मदतीला धावणाऱ्या जमीर यांचा खून केला. याची चर्चा पाकीजा मशीद परिसरात सुरू होती.तीन पथके रवानाखुनानंतर संशयित आलीम व शाहरुख पठाण या दोघांनी पलायन केले. या दोघांच्या शोधासाठी सांगली शहर पोलिसांची तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. एक पथक कर्नाटकातही पाठविण्यात आले आहे, तर इतर दोन पथके सांगली, कोल्हापूर, सोलापूर व सातारा जिल्'ात संशयितांचा शोध घेत असल्याचे निरीक्षक मिलिंद पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :MurderखूनSangliसांगली