शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

सांगली जिल्ह्यातील ९०१ शेतकऱ्यांकडून बोगस फळपीक विमा, कारवाई होणार; तालुकानिहाय संख्या..जाणून घ्या

By अशोक डोंबाळे | Updated: December 10, 2024 17:19 IST

अशोक डोंबाळे सांगली : जिल्ह्यात ९०१ शेतकऱ्यांनी जादा क्षेत्र दाखवून अथवा फळपीक नसताना कागदोपत्री विमा उतरविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ...

अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यात ९०१ शेतकऱ्यांनी जादा क्षेत्र दाखवून अथवा फळपीक नसताना कागदोपत्री विमा उतरविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विमा कंपनीकडून तक्रार आल्यानंतर कृषी विभागाने पीकविमा उतरविलेल्या क्षेत्राच्या प्रत्यक्षात केलेल्या तपासणीत ही बनवाबनवी उघड झाली आहे. या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरु झाली आहे.पुनर्रचित हवामान आधारित ‘ फळपीक विमा योजना’ मृग बहार २०२४-२५ मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या ९ फळपिकांसाठी जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आला. जिल्ह्यात मृग बहरांतर्गत विमा योजनेत २ हजार ७४७ शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन १ हजार ६४६.३६ हेक्टर क्षेत्रावर फळपीक विमा उतरविला होता. यामध्ये ९०१ शेतकऱ्यांच्या ५९२.२ हेक्टर क्षेत्रावरील तफावत आढळली आहे.

यामध्ये ३०३ शेतकऱ्यांनी ३३६.५८ हेक्टर क्षेत्रात फळपीक नसताना लागण असल्याचा बोगस फळपीक विमा उतरला होता. तसेच ५२३ शेतकऱ्यांनी फळपीक असणाऱ्या क्षेत्रापेक्षा जादा दाखविले आहे. यामध्ये १७४.११ हेक्टर क्षेत्र जास्त दाखविल्याची चौकशीमध्ये माहिती उघडकीस आली आहे. तसेच ७५ शेतकऱ्यांचे वय बसत नसताना ५१.५१ हेक्टर क्षेत्रातील फळपीक विमा उतरला होता. प्रत्यक्षात या शेतकऱ्यांनी फळपीक विमाच उतरला नव्हता. या बोगस शेतकऱ्यांचा शासनाने विमा कंपनीकडे भरलेली विम्याची रक्कम परत मिळणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाकडून हालचाली सुरु आहेत. तसेच फळपीक विम्यामध्ये बाेगसगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

‘प्रलोभनाला बळी पडू नये’जादा विमा मिळवून देतो, असे सांगून शेतकऱ्यांना चुकीची माहिती देण्यास भाग पाडले जात आहे. मात्र, यात शासनाची फसवणूक होत असल्यामुळे फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडू नये. योग्य व कायदेशीर माहिती देत विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे.

बोगस फळपीक विमा लाभार्थ्यांची संख्यातालुका - शेतकरी - क्षेत्र हेक्टरमध्ये

  • आटपाडी - १६६ - ९७.११
  • जत - ६८७ - ४७८.१८
  • क.महांकाळ - ४४ - १४.२९
  • खानापूर - ३ - १.४३
  • मिरज - १ - १.१९
  • एकूण - ९०१ - ५९२.२
टॅग्स :SangliसांगलीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी