शहरं
Join us  
Trending Stories
1
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
2
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
3
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
4
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
5
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
6
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
7
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
8
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
9
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
10
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
11
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
12
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
13
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
14
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
15
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
16
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम
17
घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा, पिस्तुलासह रॉडने हल्ला 
18
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
20
दुर्गापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन तरुणांना अटक; सुवेंदू अधिकारी यांनी केली एन्काउंटरची मागणी

शालेय साहित्याची सक्ती झाल्यास कारवाई

By admin | Updated: April 8, 2015 00:29 IST

लोकमत संवादसत्र : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला संस्थांना इशारा--लोकमत संवादसत्र

श्रीनिवास नागे/अविनाश कोळी/अशोक डोंबाळे - सांगलीजिल्ह्यातील कोणत्याही शाळेने शालेय साहित्यासाठी पालकांवर सक्ती केली तर, संबंधित संस्थेवर शासनाच्या निर्णयाप्रमाणे तातडीने कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मधुकर यादव यांनी मंगळवारी ‘लोकमत’तर्फे आयोजित संवादसत्रात दिला. चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचेच ध्येय ठेवून शिक्षणसंस्थांनी काम करावे. काही संस्थांनी सुरू केलेली दुकानदारी सामाजिक भान ठेवून बंद करावी. अशा गोष्टींच्या माध्यमातून पालकांचे आर्थिक नुकसान होत आहे, अशी मते विविध मान्यवरांनी या संवादसत्रात व्यक्त केली. ‘शैक्षणिक साहित्याची शिक्षणसंस्थांकडून होणारी सक्ती’ या विषयावर मंगळवारी ‘लोकमत’च्या सांगलीतील कार्यालयात संवादसत्र पार पडले. यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सभापती मानसिंग शिंदे, जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मधुकर यादव, कक्ष अधिकारी अजिंक्य कुंभार, पालक संघटनेचे संजय चव्हाण, न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक डी. जी. भावे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी प्रकाश चव्हाण, विद्यार्थी संसदेचे जिल्हाध्यक्ष सचिन सव्वाखंडे, शालेय साहित्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष नाना कांबळे, राज्य संघटक मोहन पाटील, उपाध्यक्ष विनायक मोहिते, जगोद्धर पाटील, गौरव शहा आदी सहभागी झाले होते. शैक्षणिक साहित्याच्या सक्तीविषयीचे शासनाचे निर्देश, त्यासंदर्भातील परिपत्रके, प्रत्यक्ष कारवाईसाठी येत असलेल्या अडचणी, संस्थांची भूमिका, पालक आणि विद्यार्थी संघटनांची मते, साहित्य विक्रेत्यांच्या अडचणी अशा सर्व बाजूंनी संवादसत्रात चर्चा करण्यात आली. शैक्षणिक संस्थांचा मूळ उद्देश शिक्षणाचा दर्जा सुधारणे हाच आहे. व्यावसायिक हेतूने शाळा, महाविद्यालये चालविणे चुकीचे आहे, असा सूर यावेळी उमटला. साहित्य विक्रीतून चाळीस कोटींची उलाढालजिल्ह्यात अडीच हजार माध्यमिक, प्राथमिक खासगी व विनाअनुदानित शाळा असून, पाच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी अडीच लाख विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांकडून प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या शैक्षणिक साहित्याची सक्ती होत आहे. यातून शिक्षण संस्था चालक वर्षाला चाळीस कोटी मिळवत आहेत.चाळीस कोटींची उलाढाल छुप्यापध्दतीने होत आहे. यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा कर बुडविला जात आहे.संवादसत्रातील महत्त्वाचे निर्णयप्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या शैक्षणिक साहित्याची सक्ती होत असल्याबाबत तक्रारी आल्यास, पुरावे सापडल्यास तातडीने संस्थांवर कारवाई होणारसंस्थेच्या आवारातच विक्री केली जात असेल तरीही कारवाई होणार. जिल्ह्यातील सर्व शाळांच्या व्यवस्थापनांना आणि मुख्याध्यापकांना शैक्षणिक साहित्याची सक्ती न करण्याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिली जाणार शाळा व्यवस्थापन समिती अधिक बळकट करून शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला तपासणी करण्याबाबत प्रयत्न केले जातील. साहित्यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची धमकी दिल्यास कारवाई.