शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली उपायुक्तांवर कारवाई, ठेकेदारांचे बिल रोखले-महासभेत ‘अमृत’चे पाणी पेटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 01:18 IST

सांगली : महापालिकेच्या अमृत योजनेतून मंजूर मिरज पाणी पुरवठा योजनेच्या निविदेवरून गुरुवारी महासभेत वादळी चर्चा झाली. आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यावर

ठळक मुद्दे खेबूडकर, पाटील यांच्यावर सदस्यांची टीकेची झोड

सांगली : महापालिकेच्या अमृत योजनेतून मंजूर मिरज पाणी पुरवठा योजनेच्या निविदेवरून गुरुवारी महासभेत वादळी चर्चा झाली. आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यावर सदस्यांनी टीकेची झोड उठविली. सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास उपायुक्त पाटील यांनी असमर्थता दर्शविल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश महापौर हारुण शिकलगार यांनी दिले. तसेच या योजनेच्या ठेकेदाराचे बिल न देण्याचा ठरावही करण्यात आला.

अमृत योजनेअंतर्गत मिरज पाणी योजनेच्या १०३ कोटी रुपयांच्या कामाला शासनाने मंजुरी दिली होती. या योजनेची निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. स्थायी समितीने निविदेला मंजुरी देताना वाढीव दराची निविदा नाकारली होती. तसेच वाढीव १२ कोटींचा बोजा शासनाने सोसावा, असा ठराव केला होता. तो डावलून प्रशासनाने निविदा मंजूर करून ठेकेदाराला वर्कआॅर्डर दिली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, न्यायालयाने निविदा प्रक्रिया बेकायदेशीर ठरविली आहे. अजून या प्रकरणी निकाल आलेला नाही.

न्यायालयाच्या निर्देशावर गुरुवारी महासभेत सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठविली. गौतम पवार यांनी उपायुक्त पाटील यांच्यावर निशाणा साधला. उपायुक्तांना अधिकार नसताना त्यांच्या सहीने ठेकेदाराला वर्कआॅर्डर देण्यात आली. आयुक्तांना त्यांना प्राधिकृत केले असले तरी, त्याला स्थायीची मान्यता घेतली गेली नाही. चार अधिकारी बंद खोलीत बसून कारभार करतात. दुसरीकडे नगरसेवकांच्या फायली मात्र मंजूर करण्यास दिरंगाई केली जाते. प्रशासनाचा दुटप्पी कारभार सुरू आहे. याबाबत आयुक्तांनी सभागृहात व जनतेसमोर भूमिका स्पष्ट करावी, तोपर्यंत सभा तहकूब करावी, अशी मागणी केली.

शेखर माने यांनी कुणाच्या लाभासाठी अमृत योजनेची जादा दराची निविदा मंजूर करण्यात आली, याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी केली. यावर उपायुक्त पाटील यांनी, आयुक्तांनी वर्कआॅर्डरवर सही करण्यासाठी प्राधिकृत केले होते. तेवढ्यापुरताच माझा संबंध आहे. निविदा प्रक्रियेबाबत मी बोलू शकत नाही. सध्या ही बाब न्यायप्रविष्ट आहे. प्राधिकृतबाबत आयुक्तच उत्तर देतील, असा जुजबी खुलासा केला. यावरून पुन्हा सभेत वादंग निर्माण झाले.

गौतम पवार यांनी उपायुक्त पाटील या बेजबाबदार उत्तरे देत असल्याचा आरोप केला. प्राधिकृत करण्याची कायद्यातील तरतूद वाचून दाखवावी, अशी मागणीही केली. पण पाटील यांनी त्याला नकार दिला.

यावर पवार यांनी, हा जनतेचा, सभागृहाचा अवमान असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. शेखर माने म्हणाले, शासकीय योजनांचा गैरअर्थ काढून पैशाची लूट सुरू आहे. ही योजना दहा वर्षातही पूर्ण होणार नाही. महासभा, स्थायीचे असलेले सर्व अधिकार डावलून प्रशासन दरवाढ मंजूर करते, अमृत योजनेवर शंभर कोटी खर्च होत आहेत. न्यायालयात दोन याचिका दाखल आहेत. निकाल लागेपर्यंत ठेकेदाराचे बिल थांबवा, अन्यथा जादा रकमेची वसुली लागेल, असा इशारा दिला. यावर महापौर शिकलगार यांनी स्मृती पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले. अंतिम सुनावणी होईपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येऊ नये, असे आदेश दिले.सभागृहात वाद; नियमांचे वाचन नाहीचअमृत योजनेच्या वर्कआॅर्डरवर उपायुक्त स्मृती पाटील यांनी सह्या केल्याचे प्रकरण सभेत चांगलेच तापले होते. खुद्द पाटील यांनीही आयुक्तांच्या आदेशानुसार सह्या केल्याची कबुली दिली. पण इतर निविदा प्रक्रियेबाबत त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. प्राधिकृत करण्याच्या नियमाचे वाचन केले नाही. यावर पवार यांनी, तुम्हाला अधिनियम माहीत नसेल तर, खुर्चीवर कशाला बसता, पगार कशाला घेता, असा प्रश्नांचा भडिमार केला. पाटील यांनी अधिनियम वाचावा, अशी विनंती महापौरांनी केली. पण त्यांनी नकार दिला. शेवटी तर त्यांनी हातच जोडले. उपायुक्त सुनील पवार यांना अधिनियम वाचण्यास सांगा, असेही त्या वारंवार सुचवत होत्या.

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूक