शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

युरियाचे लिंकिंग केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 17:29 IST

सांगली जिल्ह्यात कुठेही युरियाची टंचाई नसून तीन हजार ९५५ टन युरिया शिल्लक आहे, आणखी दोन हजार टन युरिया दोन दिवसात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.

ठळक मुद्देयुरियाचे लिंकिंग केल्यास कारवाई तासगाव तालुक्यातील अनेक विक्रेत्यांचीही पाहणी

सांगली : जिल्ह्यात कुठेही युरियाची टंचाई नसून तीन हजार ९५५ टन युरिया शिल्लक आहे, आणखी दोन हजार टन युरिया दोन दिवसात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली. तसेच युरिया खरेदीसाठी डीलर अथवा विक्रेत्यांनी अन्य खताचे लिंकिंग केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही मास्तोळी यांनी दिला आहे. तासगाव तालुक्यातील अनेक विक्रेत्यांचीही शुक्रवारी पाहणी केली असून, कुठेही युरियाची टंचाई नाही, असे ते म्हणाले.तासगाव तालुक्यात युरियाची टंचाई असल्याचे सांगून कृषी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न काही लोकप्रतिनिधींनी केला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मास्तोळी यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांनी तासगाव तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर मास्तोळी सांगलीत आले होते. यावेळी त्यांना युरिया टंचाईबाबत विचारले असता, ते बोलत होते.ते म्हणाले की, जिल्ह्यात सध्या तीन हजार ९५५.४९ टन युरिया शिल्लक आहे. येत्या दोन दिवसात दोन हजार टन युरिया अजून येत आहे. जिल्ह्यात कुठेही रासायनिक खताची टंचाई निर्माण होणार नाही, याकडे आमचे बारकाईने लक्ष आहे. प्रत्येक तालुक्यातील अधिकारीही खताच्या साठ्याबाबत लक्ष ठेवून आहेत. काही ठिकाणी विक्रेत्यांनी डीलरकडून युरिया खताबरोबर अन्य खते घेण्यासाठी सक्ती केली जात आहे, अशा तक्रारी आहेत. विक्रेते आणि डीलरनी कोणत्याही खताबाबत लिंकिंग करुन खत विक्री करु नये, अशी सक्त सूचना आहे. जर एखाद्या डीलरने विक्रेत्यांची इच्छा नसताना त्यांना सक्तीने अन्य खते दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मास्तोळी यांनी दिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली