शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विट्यात मोटारसायकल चोरट्याला अटक, एलसीबीची कारवाई : दोन गाड्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 18:36 IST

विटा बसस्थानक परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी मोटारसायकल चोरट्याला अटक केली. आकाश अशोक बुधावले (वय १९, रा. कलेढोण, ता. खटाव, जि. सातारा) असे चोरट्याचे नाव आहे.

सांगली : विटा बसस्थानक परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी मोटारसायकल चोरट्याला अटक केली. आकाश अशोक बुधावले (वय १९, रा. कलेढोण, ता. खटाव, जि. सातारा) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोड्याच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पेट्रोलिंग करून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध पथके नियुक्त करून पेट्रोलिंगचे काम सुरू आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, कर्मचारी उदय साळुंखे, अनिल कोळेकर, सागर टिगरे हे खासगी वाहनातून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करीत असताना, खबऱ्यामार्फत कलेढोण येथील आकाश बुधावले हा विनाक्रमांकाची मोटारसायकल वापरत असल्याची माहिती मिळाली. तो विटा येथील बस स्थानकावर येणार असल्याचे समजताच पथकाने सापळा रचला. आकाश हा मोटारसायकलवरून बसस्थानक परिसरात येताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोटारसायकलीबाबत चौकशी करता, तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने, आटपाडी येथून दोन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. या दोन्ही मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून बुधावले याला पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

 

टॅग्स :SangliसांगलीPolice Stationपोलीस ठाणे