शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बुधगाव येथे पिस्तूल कमरेला लावून फिरणाऱ्यावर कारवाई; पोलिसांकडून दोन पिस्तुलांसह दिड लाखांचा मुद्देमाल जप्त

By शरद जाधव | Updated: April 23, 2023 18:36 IST

बुधगाव येथे पिस्तूल कमरेला लावून फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

सांगली : बुधगाव (ता.मिरज) येथे कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली. दीपक जयसिंग रजपूत (वय ३७, रा. राममंदिरजवळ, बुधगाव ता.मिरज) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसेसह अन्य असा एक लाख ४७ हजार २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्र बाळगण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे दहशत माजविण्याच्या उद्देशाने शस्त्र घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. एलसीबीचे पथक गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, संशयित रजपूत हा कमरेला पिस्तूल लावून दुचाकीवरून गावात फिरत आहे. त्यानुसार बुधगाव येथील स्मशानभूमीजवळ त्याला अडवून झडती घेतली. यात त्याच्याजवळ पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व दुचाकी असा ९१ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करत त्याच्यावर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.

रजपूत याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने घरात एक पिस्तूल असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिस पथकाने छापा मारून त्याच्या घरातून पिस्तूल व जिवंत काडतुसे असा ५१ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण मगदूम, मेघराज रूपनर, हेमंत ओमासे, अरुण औताडे, कुबेर खोत, संदीप नलवडे, कपिल साळुंखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. आठवड्यात दुसरी कारवाईचारच दिवसांपूर्वी पोलिसांनी बुधगाव येथेच संदीप आनंदा निकम याच्यावर कारवाई केली होती. रजपूत याने ही पिस्तुले निकम याच्याकडूनच घेतल्याचे पोलिसांना सांगितले. रजपूत हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.

 

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस