शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील पायलट गाडीला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 16:40 IST

Accident Sangli Minister : कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील पायलट गाडीला मंगळवारी सकाळी अपघात झाला. नागठाणे (ता. पलूस ) येथे महापुर स्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री कदम जात होते, त्यावेळी पायलट गाडी रस्त्याकडेच्या विजेच्य खांबावर जाऊन आदळळी. मंत्री कदम पूर्णत: सुरक्षित आहेत.

ठळक मुद्देमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील पायलट गाडीला अपघातअपघातात पायलट गाडीचे मोठे नुकसान

सांगली : कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील पायलट गाडीला मंगळवारी सकाळी अपघात झाला. नागठाणे (ता. पलूस ) येथे महापुर स्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री कदम जात होते, त्यावेळी पायलट गाडी रस्त्याकडेच्या विजेच्य खांबावर जाऊन आदळळी. मंत्री कदम पूर्णत: सुरक्षित आहेत.पलूस तालुक्यातील अनेक गावांना महापुराचा प्रचंड फटका बसला आहे. त्याच्या पाहणीसाठी डॉ. कदम चार दिवसांपासून पलूस तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी सकाळीदेखील ते ताफ्यासह नागठाणे परिसरात फिरत होते. त्यावेळी पुढे धावत असलेल्या पायलट गाडीला एका दुचाकीस्वाराने कट मारला.

दुचाकी अचानक आडवी आल्याने पायलट चालकाचे गाडीवरील नियंत्रण हरवले. रस्ता पुरेसा रुंद नसल्याने व निसरडा झाल्याने पायलट गाडी घसरली. कडेच्या खांबावर जाऊन आदळली व उलटली. गाडीतील दोघे पोलीस कर्मचारी जखमी झाले.मंत्री कदम यांनी तातडीने गाडी थांबवून पोलीसांच्या मदतीला धाव घेतली. जखमींना स्वत:च्या गाडीत बसवले व आष्टा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील पाहणी दौऱ्यासाठी रवाना झाले. अपघातात पायलट गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. पोलीस हवालदार सुर्वे व सहकारी पोलीस जखमी झाले.

टॅग्स :AccidentअपघातVishwajeet Kadamविश्वजीत कदमSangliसांगली