शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

जगभरातील ५० हजार भाविकांकडून अभिषेक; गोल्डन बुकमध्ये मिरवणुकीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 02:08 IST

श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यात गेल्या आठ दिवसांत जगभरातून आलेल्या पन्नास हजार भाविकांनी अभिषेक केला आहे. दररोज सहा हजारांहून अधिक भाविक अभिषेक करीत आहेत. या सोहळ्याचा सोमवारी समारोप होणार आहे. चारूकीर्ती भट्टारक स्वामी यांच्या नेतृत्वाखाली समारोप कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याचे काम सुरू आहे.

सांगली : श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यात गेल्या आठ दिवसांत जगभरातून आलेल्या पन्नास हजार भाविकांनी अभिषेक केला आहे. दररोज सहा हजारांहून अधिक भाविक अभिषेक करीत आहेत. या सोहळ्याचा सोमवारी समारोप होणार आहे. चारूकीर्ती भट्टारक स्वामी यांच्या नेतृत्वाखाली समारोप कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याचे काम सुरू आहे.श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सव ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला. मस्तकाभिषेकाचा मुख्य सोहळा १७ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून, गेल्या आठ दिवसांत जगभरातील पंचवीस लाख भाविकांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. मस्तकाभिषेक सोहळ्यात दररोज भगवान बाहुबलींच्या मूर्तीवर अभिषेक केला जात आहे. त्यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून पहाड उभा केला आहे. दररोज चार हजार कळसधारक कुटुंबासह अभिषेकात भाग घेत आहेत. नव्याने बांधलेल्या पहाडावर कलशधारक, त्यांच्या कुटुंबासह सहा हजार भाविक अभिषेकासाठी जात आहेत. या अभिषेकासाठी जगभरातून भाविक दाखल झाले आहेत. त्यात अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, रशिया, दक्षिण अफ्रिका अशा विविध देशांतून आलेल्या भाविकांचाही समावेश आहे.गोल्डन बुकमध्ये मिरवणुकीची नोंदमहामस्तकाभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी श्रवणबेळगोळ येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू व उत्तर भारतातील बाराशेहून अधिक पथकांनी विविध संस्कृतीचे दर्शन घडवले होते. या मिरवणुकीत लाखो लोक सहभागी झाले होते. गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्ने या मिरवणुकीची दखल घेत सर्वात मोठी व भव्य धार्मिक मिरवणूक म्हणून नोंद केली आहे.राजनाथ सिंह आज सहभागी होणारमहामस्तकाभिषेक सोहळ्यात रविवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहेत. ते दुपारी दोन वाजता श्रवणबेळगोळमध्ये दाखल होतील.

टॅग्स :Sangliसांगली