शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
2
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
3
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
4
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
5
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
6
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
7
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
8
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
9
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
11
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे
12
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
13
२० तासांचा रहस्यमय प्रवास! चीनला पोहचण्यासाठी किम जोंग यांची सीक्रेट तयारी; शत्रूंना देणार चकवा
14
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
15
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
16
बाबर आझमची 'मॅचविनिंग' खेळी; शोएब अख्तर, वकार युनिससारख्या दिग्गजांची केली धुलाई
17
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
18
जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत
19
बदलापुरात पोलीस कॉन्स्टेबल श्रावणी वारिंगेंनी तिसर्‍या मजल्यावरून मारली उडी; कारण काय?
20
Gauri Pujan 2025: गौराईला नैवेद्य अर्पण करण्याआधी ताटाखाली काढा पाण्याचे मंडल आणि म्हणा 'हा' मंत्र

कडेगाव तालुक्याला सभापतिपदाची ‘आॅफर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2015 00:26 IST

विटा बाजार समिती निवडणूक : विरोधी पॅनेलचा अजेंडा : सत्ताधाऱ्यांना आव्हान

दिलीप मोहिते-विटा --खानापूर तालुक्याच्या विभाजनापूर्वी स्थापन झालेल्या विटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे आता कडेगाव व खानापूर हे दोन तालुके कार्यक्षेत्र झाले असून, या दोन तालुक्यांच्या संयुक्त असलेल्या विटा बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवारी दाखल केलेल्या व सत्ताधाऱ्यांत नाराजी असलेल्या इच्छुक उमेदवारांवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने निशाणा साधला आहे. यावेळी विरोधी पॅनेलच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक व कॉँग्रेसचे माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी यावर्षी कडेगाव तालुक्याला बाजार समितीचे सभापतीपद देण्याची ‘आॅफर’ दिली असून, कडेगाव तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती देण्याचाही अजेंडा जाहीर केला आहे. विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला आता रंगत येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांचे वर्चस्व असलेल्या बाजार समितीत यावेळी आ. बाबर, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांच्यातील युतीवर जवळ-जवळ शिक्कामोर्तबच झाले आहे. मात्र, औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे या युतीतील जागावाटपाचा निर्णय होऊ शकला नाही. या युतीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक व कॉँग्रेसचे माजी आ. सदाशिवराव पाटील यांना अद्यापपर्यंत तरी निमंत्रित केले नसल्याचे समजते.त्यामुळे बाजार समितीसाठी सत्ताधारी आ. बाबर यांच्याविरोधात अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक व सदाशिवराव पाटील हे विरोधी पॅनेलचे उमेदवार म्हणून लढतीच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे सांगण्यात येते. अ‍ॅड. मुळीक यांच्या विरोधी पॅनेलमध्ये जुन्या शिवसेना व भाजपच्या गटाने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुनी शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस व माजी आ. सदाशिवराव पाटील यांचा कॉँग्रेस गट एकत्रित करून सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान उभे करण्याची व्यूहरचना विरोधकांनी केली आहे.त्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या कडेगाव तालुक्यातील संभाव्य इच्छुक उमेदवारांना विरोधकांनी लक्ष्य केले आहे. त्यांच्याबरोबरच सत्ताधारी गटातील नाराजांनाही विरोधकांनी आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कडेगाव तालुक्यातील संस्था व उमेदवार विरोधी पॅनेलमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी विरोधी गटाचे अ‍ॅड. मुळीक यांनी सत्तेत आल्यानंतर कडेगाव तालुक्याला यावेळी सभापतीपद देण्याची आॅफर दिली आहे, तर खानापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून कडेगाव तालुक्याला स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याला प्राधान्य देण्याचे गाजरही दाखविण्यात आले केले आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीला आता रंगत येण्यास सुरुवात झाली आहे. विटा कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्यावेळी आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत होतो. आम्हाला १-२ जागा दिल्या होत्या. परंतु, त्यावेळी पदाधिकारी निवडीबाबत दिलेला शब्द पाळला नाही. कोणालाही विश्वासात न घेता पदाधिकारी निवडी झाल्या. त्यामुळे आता आम्ही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार आहोत. सर्व जागांवर आम्ही सक्षम उमेदवार दिले आहेत. सत्तेत आल्यानंतर कडेगाव तालुक्याला पहिल्यांदा सभापतीपद व कडेगाव तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती देणे हा आमचा अजेंडा आहे.- अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, कार्याध्यक्ष, खानापूर तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीसमविचारी नेते विरोधासाठी सरसावलेविटा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विरोधी अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक व माजी आमदार सदाशिवराव पाटील समर्थकांनी पॅनेलची जुळणी केली आहे. जुन्या शिवसेना गटाचे संजय विभुते, सुभाष मोहिते, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, शेतकरी संघटनेचे नवनाथ पोळ यांच्यासह समविचारी लोकांची एकत्रित मोळी बांधण्यात माजी आ. पाटील व अ‍ॅड. मुळीक यांना यश आले आहे. त्यामुळे विटा बाजार समितीसाठी विरोधी पॅनेलमधून मैदानात उतरून सत्ताधारी आ. बाबर, मोहनराव कदम व पृथ्वीराज देशमुख यांच्या युतीला आव्हान देण्याचा निर्णय अंतिम झाला आहे.