शहरं
Join us  
Trending Stories
1
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
2
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
3
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
4
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
5
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
6
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
8
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
9
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
10
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
11
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
13
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
14
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
15
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
16
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
17
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
18
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
19
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
20
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत नववर्षाच्या स्वागतालाच कॉलेजसमोर तरूणाचा भरदिवसा खून, पोलिसांनी अवघ्या दोन तासात संशयितांना घेतलं ताब्यात

By घनशाम नवाथे | Updated: January 1, 2026 18:03 IST

भरदिवसा हा हल्ल्याचा थरार पाहून विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली

सांगली : नववर्षाच्या स्वागतालाच कॉलेज कॉर्नर परिसरातील एन.एस. लॉ कॉलेजच्या दारात पूर्ववैमनस्यातून विष्णू सतीश वडर (वय २३, रा. वडर काॅलनी) याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. खूनानंतर दोघे संशयित पसार झाले. अवघ्या दोन तासात विश्रामबाग पोलिसांनी संशयित आर्यन हेमंत पाटील (वय २३, रा. रत्नदीप हौसिंग सोसायटी, कुपवाड) याला साथीदारासह ताब्यात घेतले आहे. दीड वर्षापूर्वी आर्यनवर ज्या चौकात हल्ला झाला होता, त्याच चौकात विष्णूवर वार करून हल्ल्याचा बदला घेतल्याचा प्रकार घडला.संशयित आर्यन पाटील आणि मृत विष्णू वडर यांच्यात दीड वर्षापूर्वी रागाने बघण्यावरून वाद झाला होता. आर्यन पाटील हा तेव्हा छायाचित्रकार म्हणून काम करत होता. रागाने का बघितलास म्हणून त्याच्यावर एन.एस. लाॅ कॉलेजच्या दारात असलेल्या चौकात एक जुलै २०२४ रोजी चाकूने हल्ला करण्यात आला होता. याबाबत मृत विष्णू वडर, पृथ्वीराज कलकुटगी आणि मंथन नामक तरूणाविरूद्ध तेव्हा गुन्हा दाखल झाला होता.दीड वर्षापूर्वी झालेल्या हल्ल्याचा आर्यन पाटील याला राग होता. लॉ कॉलेजच्या बाहेर राॅयल टॉवरसमोरील चौकात काही टोळक्यांचा अड्डा बनला होता. तेथे विष्णू वडर साथीदारांबरोबर थांबत होता. गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर अद्यापही वर्दळ होती. विश्रामबागचा पोलिस कर्मचारी फेरफटका मारून गेला होता. तेवढ्यात पूर्वीच्या वादातून विष्णू याच्यावर आर्यन आणि साथीदाराने चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला चढवला. डोक्यात, पोटावर आणि मांडीवर वार झाल्यानंतर तो गंभीर जखमी होऊन पडला. भरदिवसा हा हल्ल्याचा थरार पाहून विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यात घबराट पसरली. चौकातील दुकानांनी पटापट शटर खाली ओढले. हल्लेखोर पसार झाल्यानंतर नागरिकांनी जखमी विष्णू याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर उपअधीक्षक संदीप भागवत, विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे आदींनी भेट दिली. तत्काळ पोलिसांची पथके रवाना झाली. विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या दोन तासात दोघा संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतू अन्य काही कारण आहे काय? याचा तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: New Year's Day murder outside college; suspects arrested.

Web Summary : In Sangli, a young man was murdered near a college due to prior animosity. Police arrested two suspects, including one avenging an old attack. The victim died in hospital.