Sangli: मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगून महिला डॉक्टरला दोन लाखांना फसवले

By संतोष भिसे | Published: May 14, 2024 07:22 PM2024-05-14T19:22:07+5:302024-05-14T19:22:33+5:30

मिरज : मिरजेत डॉक्टर महिलेस मनी लॉंड्रींगचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगत अज्ञात भामट्याने ऑनलाईन दोन लाख रुपये उकळले. याप्रकरणी ...

A woman doctor was cheated of two lakhs by saying that a case of money laundering had been registered in miraj sangli | Sangli: मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगून महिला डॉक्टरला दोन लाखांना फसवले

Sangli: मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगून महिला डॉक्टरला दोन लाखांना फसवले

मिरज : मिरजेतडॉक्टर महिलेस मनी लॉंड्रींगचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगत अज्ञात भामट्याने ऑनलाईन दोन लाख रुपये उकळले. याप्रकरणी शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

डॉ. श्रुती सांगळे यांना अज्ञाताने फोन करून मुंबई पोलिसातून बोलत आहे. तुमच्याविरूध्द मनी लॉंड्रींग फ्रॉड केस चालू आहे असे सांगितले. केसचा तपास पोलिस करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे करून घेतो, त्यासाठी ऑनलाईन तक्रार देऊन पैसे पाठवावे लागतील. पाठवलेली रक्कम दहा मिनिटांत परत तुमच्या बँक खात्यावर जमा होतील असे खोटे सांगितले.

डॉ. श्रुती यांच्या मोबाईलवर स्काय पी ॲपची लिंक पाठवली. डॉ. श्रुती यांनी ती उघडल्यानंतर भामट्याने गुगल पे वरून युपीआय ट्रॅझक्शनव्दारे १ लाख ९८ हजाराची रक्कम फसवणूक करून वळती करुन घेतली.

Web Title: A woman doctor was cheated of two lakhs by saying that a case of money laundering had been registered in miraj sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.