शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: दरीबडची येथील लांडग्याला रेबीजची लागण, पाच जणांवर केला होता हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 13:59 IST

जखमी व्यक्तींची प्रकृती चांगली; चौघांना डिस्चार्ज, दोघांवर उपचार सुरू

दरीबडची : दरीबडची (ता.जत) येथे वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी लांडगा गावापासून ४ किमी अंतरावर रायाप्पा कन्नुरे यांच्या वस्तीजवळ मृत अवस्थेत आढळून आला. त्याला रेबीजची लागण झाली होती. रेबीजची लागण झाली असल्याने शवविच्छेदन केले नाही. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृत लांडग्याचे रात्री दहन केले. सर्व पाचही जखमी व्यक्तींची प्रकृती चांगली आहे. गावातील सर्व २९ जखमी पशुधनावर पशुवैद्यकीय अधिकारी कुणाल कांबळे यांनी उपचार केले.पूर्व भागातील दरीबडची गावालगत वन विभागाचे जंगल आहे. बुधवारी सकाळी पिसाळलेला लांडग्याने पाच जणांवर हल्ला केला होता. तसेच २९ जनावरांवर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला केला. सर्व जखमी व्यक्ती मिरज व सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील चार व्यक्तींना उपचार करून डिस्चार्ज दिला आहे. सध्या आनंद गेजगे, पार्वती घागरे यांच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत.

नुकसानभरपाई तत्काळ देणारजखमी व्यक्ती, जनावरांच्या औषधांची बिले वनविभागाला सादर करावीत. वनविभागाला माहिती देऊन अर्ज करावा. सर्व जखमी व्यक्ती व पशुधन यांना वनविभागामार्फत शासननिर्णयप्रमाणे नुकसानभरपाई तत्काळ देण्यात येणार असल्याची माहिती जत वनक्षेत्रपाल प्रवीण पाटील यांनी दिली.अन् आनंदा गेजगे बचावलेआनंदा गेजगे हे गावालगत शेतामध्ये भुईमूग टोकण्याचे काम करीत होते. ते खाली बसून काम करीत असतानाच त्यांच्यावर लांडग्याने झडप घातली. लांडग्याने त्यांच्या चेहऱ्यावरच हल्ला केल्याने ते जमिनीवर कोसळले. काही ग्रामस्थांनी लांडग्याला दगडाने मारून त्याला हुसकावून लावले. त्यामुळे आनंदा गेजगे थोडक्यात बचावले.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग