शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- रामायणाची परंपरा जपणारी बेडगची यात्रा उत्साहात, त्राटिकेच्या सोंगाची २०० वर्षांची अनोखी परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 18:50 IST

त्राटिकाचे सोंग हे यात्रेचे मुख्य आकर्षण

मिरज : बेडग (ता. मिरज) येथे रामायणाची परंपरा जपणारी बेडगची मरगाई देवीची यात्रा उत्साहात पार पडली.  यात्रेत रामायणातील कथेवर आधारित पारंपरिक त्राटिकेचे सोंग सादर करण्यात आले. वीस हजार लोकवस्तीच्या बेडग गावातील  ग्रामदैवत  मरगाई देवीची दरवर्षी गुढीपाडव्यानंतर यात्रा  भरते.  रावणाची  बहीण त्राटिका व तिच्या राज्यकारभाराविषयी सोंग हे बेडगच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या सोंगांची  बेडग गावात गेल्या २०० वर्षांची परंपरा आहे. पाडव्या दिवशी गुढी उभारल्यानंतर  गावात दळण - कांडप  बंद करण्यात येते. देवीची  पालखी निघाल्यानंतर दळण  कांडपास सुरुवात होते. यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. त्राटिकाचे सोंग हे यात्रेचे मुख्य आकर्षण आहे. हे सोंग राज्यात अन्यत्र  पाहायला मिळत नाही. रामायणाच्या काळात  सांगली जिल्ह्यात दंडोबा या परिसरातील दंडकारण्यात रावणाची बहीण त्राटिकाचे  राज्य होते, अशी आख्यायिका आहे.  तिच्या  राज्य कारभाराविषयी वर्णन त्राटिकाचे सोंगाद्वारे सादर केले जाते. त्या काळात युद्धाच्या वेळी वापरलेले घोडे व इतर  प्राणीही सोंगाच्या रूपात दाखवून  ही कथा जिवंत केली जाते. बारा बलुतेदारांचा सहभाग

  • त्राटिकाचे सोंग  घेणाऱ्या कलावंतांचा त्राटिकाचा  मुखवटा आकर्षक व अतिशय सुबक आहे. हे सोंग घेणारे १२ बलुतेदार आहेत. २५ फूट उंच त्राटिकेची वेशभूषा आक्राळ- विक्राळ असते. मोठा मोर पिसारा, मोठे तोंड, १२ साड्या  नेसलेली त्राटिका.  
  • दरबारी पंतप्रधान, सेनापती, घोडेस्वार, काळीचूर, बनीचर, मोर यांच्या सह  सैनिक घेऊन चौका चौकात  त्राटिकेचा दरबार भरतो.  रात्री दहा वाजेनंतर हलगीच्या तालावर  हा कार्यक्रम सुरू होतो. त्राटिका काळ्या वेशातील  सैनिकांना आपल्या राज्यव्यवस्थेविषयी प्रश्न विचारते. सैनिक विचारलेल्या  प्रश्नांना उत्तरे देतात.
टॅग्स :Sangliसांगली