शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: थक्क झाले वारकरी, श्वान करतोय पंढरीची वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:04 IST

वारकऱ्यांचा जिव्हाळा

सहदेव खोतपुनवत : ‘भेटी लागी जिवा, लागलीसे आस’, तुकोबारायांच्या या अभंगातील ओळीप्रमाणे सध्या हजारो वारकऱ्यांच्या पायी दिंड्या ठिकठिकाणाहून पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत. सर्व वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली आहे. मात्र पुनवत (ता. शिराळा) येथून गेलेल्या पायी दिंडीतून असाच एक मुका जीव वारकऱ्यांच्या बरोबर पंढरीची वारी करत आहे. तो जीव आहे एक भटका श्वान. वारकऱ्यांसमवेत रेड येथून हा श्वान दिंडीत सामील झाला आहे. विशेष म्हणजे एका पायाने तो विकलांग असूनही दिंडीत चालत आहे. श्वानाच्या या अनोख्या वारीने वारकरीही भारावून गेले आहेत.पुनवत येथून आषाढी वारीसाठी वारकऱ्यांची पायी दिंडी दिनांक २२ जून रोजी रवाना झाली. ही दिंडी रेड या गावाजवळ आल्यानंतर एक भटका श्वान दिंडीत सामील झाला. थोड्या अंतरानंतर तो परत फिरेल, असे वारकऱ्यांना वाटले मात्र तो चालतच राहिला. प्रत्येक जीवामध्ये देवाचे अस्तित्व असते. अशा भावनेने या वारकऱ्यांनी या श्वानाला दिंडीबरोबर चालू दिले. सलग बारा दिवस हा श्वान वारकऱ्यांबरोबर दिंडीतून पंढरपूरच्या दिशेला जात आहे. प्रत्येक मुक्कामात तो वारकऱ्यांच्या सोबत थांबत आहे. वारकऱ्यांनी त्याच्या गळ्यात फुलांचा हार घातला असून तो दिंडीत अत्यंत शिस्तीने चालत आहे व सर्वांचे लक्ष वेधत आहे.वारकऱ्यांचा जिव्हाळापंढरीच्या वारीत सोबत करणारा हा मुका जीव सुरक्षित रहावा, यासाठी वारकऱ्यांनीही त्याची काळजी घेतली आहे. प्रत्येक दिवशी त्याच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था केली जात आहे. मुक्कामात त्याचे इतर श्वानांपासून संरक्षण केले जात आहे. जणू वारकऱ्यांना त्याचा लळा लागला आहे.

हा श्वान आमच्यासोबत शिराळ्यापासून चालत आहे. जणू तो आमचा एक आगळावेगळा वारकरी आहे. पंढरपुरात विठुरायाचे दर्शन झाल्यानंतर त्याला आम्ही सोबत परत मूळ ठिकाणी आणणार आहोत. - सुनील खवरे, वारकरी खवरेवाडी