ईश्वरपूर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी घेतलेल्या ३ लाख रुपयांच्या परताव्यासाठी खोटा धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी कागल तालुक्यातील बाचणीच्या शेअर दलालाला येथील न्यायालयाने १ वर्षाचा साधा कारावास आणि ४ लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली.विकास दगडू हटकर (रा. बाचणी-केंबळी, ता. कागल) असे शिक्षा झालेल्या दलालाचे नाव आहे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी व्ही. ए. जाधव यांनी ही शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न दिल्यास हटकर याला आणखी ३ महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे. तसेच दंडाची ४ लाख रुपयांची रक्कम फिर्यादी सुनील बाळासाहेब आंबी (रा. जुनेखेड, ता. वाळवा) यांना देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. याकामी आंबी यांच्यामार्फत ॲड. ए. के. गायकवाड यांनी काम पाहिले.विकास हटकर याने सुनील आंबी यांच्याकडून डिसेंबर २०२१ मध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी ३ लाख रुपये घेऊन चांगल्या लाभांशासह ६ महिन्यांत ही रक्कम परत देण्याची हमी दिली होती. मात्र, हटकर याने सांगितलेल्या मुदतीनंतर ३ लाख रुपयांचा धनादेश दिला होता. आंबी यांनी हा धनादेश त्यांच्या बँक खात्यावर भरला असता तो न वटता परत आला. त्यामुळे आंबी यांनी येथील न्यायालयात हटकर विरुद्ध दावा दाखल केला होता.
Web Summary : Share market agent Vikas Hatkar jailed for a year and fined ₹4 lakhs for defrauding Sunil Ambi of ₹3 lakhs with a bounced check. The court instructed that the fine be paid to the victim.
Web Summary : शेयर बाजार एजेंट विकास हटकर को एक साल की जेल और ₹4 लाख का जुर्माना, सुनील आंबी को ₹3 लाख के धोखाधड़ी के लिए। अदालत ने जुर्माने को पीड़ित को देने का निर्देश दिया।