शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

सांगलीच्या रामभक्तांसाठी खुशखबर, अयोध्येला धावणार रेल्वे

By अविनाश कोळी | Updated: January 23, 2024 11:54 IST

सांगली : जिल्ह्यातील रामभक्तांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी जाहीर केली आहे. येत्या १३ फेब्रुवारीला सांगली स्थानकावरुन अयोध्येसाठी विशेष रेल्वे धावणार ...

सांगली : जिल्ह्यातील रामभक्तांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी जाहीर केली आहे. येत्या १३ फेब्रुवारीला सांगली स्थानकावरुन अयोध्येसाठी विशेष रेल्वे धावणार असून कानपूर, प्रयागराजमार्गे ती अयोध्येला जाणार आहे. अयोध्येतून १६ रोजी परतीची रेल्वे आहे.मंगळवारी १३ फेब्रवारी रोजी रात्री ११.४५ वाजता सांगली स्थानकावरुन अयोध्याधाम जाणारी विषेश रेल्वे गाडी (क्र.००१४८) सुटणार आहे. त्यानंतर शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी रात्री ९.२० वाजता अयोध्येतून गाडी (क्र. ००१४९) सांगली स्थानकावर परत येणार आहे. अयोध्येला जाणारी ही विशेष रेल्वे इतर मोठ्या जंक्शनप्रमाणेच सांगली रेल्वे स्थानकावर जास्त वेळ म्हणजे पाच मिनिटे थांबणार आहे.मागच्या महिन्यात सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी मध्य रेल्वेकडे श्रीरामाच्या दर्शनासाठी सांगलीतून अयोध्येला गाडी सुरू करण्याची मागणी केली होती. ती मागणी मान्य करत मध्य रेल्वेने भाविकांसाठी विशेष रेल्वे दिली आहे. त्याचप्रमाणे मंचने सांगली हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असल्याने येथे पाच मिनिटांचा थांबा देण्याची विनंती केली होती. तीही रेल्वेने मान्य केली आहे.सांगली स्टेशनवरुन सुटून ही गाडी सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, ओराई, कानपूर, फतेहपूर, प्रयागराज येथे थांबून गुरुवारी १५ फेब्रूवारीस दुपारी १ वाजता अयोध्या धाम पोहोचेल.या रेल्वेमुळे प्रवासी भाविकांना गुरुवार व शुक्रवार दोन दिवस अयोध्येत राहण्यास मिळतील. परतीच्या प्रवासात ही गाडी अयोध्या धाम येथून शुक्रवारी रात्री सुटेल. परतीच्या प्रवासातही त्याच स्थानकांवर थांबून सांगली रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे रविवारी १८ फेब्रुवारीस सकाळी १०.५० वाजता पोहोचेल.या विशेष गाडीचे आरक्षण बुधवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल. ही गाडी फक्त एकच दिवस धावणार त्यामुळे इच्छुक प्रवासी भाविकांनी तातडीने बुकिंग करावे. प्रवासाच्या सुरुवातीचे स्थानक व बोर्डिंग स्टेशन म्हणून सांगलीचा उल्लेख करावा, असे आवाहन नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरrailwayरेल्वे