शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात खून, दरोडे, खंडणीची मालिका; स्वसंरक्षणासाठी बंदूक परवाने तरी द्या, प्रशासनाचे अजब उत्तर

By अविनाश कोळी | Updated: August 7, 2023 19:13 IST

सांगली : भरदिवसा पडणारे दरोडे, किरकोळ कारणावरून होणारे खून, मारामाऱ्या, अमली पदार्थांची तस्करी अशा घटना रोखण्यात पोलिसांना अपयश आल्याने ...

सांगली : भरदिवसा पडणारे दरोडे, किरकोळ कारणावरून होणारे खून, मारामाऱ्या, अमली पदार्थांची तस्करी अशा घटना रोखण्यात पोलिसांना अपयश आल्याने हताश सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना स्वसंरक्षणासाठी बंदूक परवाने तरी द्यावेत, अशी उपहासात्मक मागणी केली. त्यास उत्तर देताना शस्त्र परवान्यासाठी नागरिकांनी कशा पद्धतीने अर्ज करावा, याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिल्याने प्रश्नकर्त्यांचे डोके चक्रावले आहे.नागरिकांच्या तक्रारीसाठी शासनाने तयार केलेल्या पोर्टलचा अजब अनुभव सांगलीकर सामाजिक कार्यकर्त्यांना आला. काही महिन्यांपूर्वी खून, दरोडे, मारामारी, खंडणीची मालिका जिल्ह्यात सुरू होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला होता. यावर निवेदने देऊनही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक व नागरिक जागृती मंचचे प्रमुख सतीश साखळकर यांनी नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे एक पत्र तयार केले. शासनाच्या ऑनलाइन तक्रार पोर्टलवर ते टाकले. कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश येत नसेल तर नागरिकांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचे परवाने तरी द्यावेत, असा आशय या पत्रात होता. मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे पत्र जिल्हा प्रशासनाकडे आले. जिल्हा प्रशासनाने त्या पत्रामागचा आशय समजून न घेता एखाद्या संगणकीय प्रोग्रामसारखा केवळ बंदूक परवाना हा शब्द पकडला. त्यांनी अशा शस्त्राच्या परवानगीसाठी नेमकी प्रक्रिया काय आहे, याचे एक लांबलचक पत्र तयार केले. नियम, तरतुदींचा उल्लेख करीत याबाबत नागरिकांना अवगत करावे, अशी सूचनाही त्यांनी संबंधित तक्रारदाराला केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी