शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात भर उन्हात रस्त्यावरच आंदोलक महिलांची पंगत, प्रकल्पग्रस्तांचा तिसऱ्या दिवशीही ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 14:25 IST

वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेले आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरुच

युनूस शेखइस्लामपूर : वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेले आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही त्याच त्वेषाने कायम ठेवले आहे. सरकारकडून आता तारीख पे तारीख न घेता निर्णय घेऊनच उठायचे असा निर्धार आंदोलकांनी केला आहे. आज, दुपारी भर रस्त्यावरच या आंदोलकांनी आपली पंगत टाकत जेवण उरकून घेतले. दरम्यान कचेरी परिसरात दंगल नियंत्रण करण्याच्या उपाय योजनांसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.सोमवार (दि.१६)पासून धरण व प्रकल्पग्रस्तांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. पहिल्या दिवशी वाटाघाटी फिस्कटल्यावर आंदोलनाला सुरुवात झाली. काल, दुसऱ्या दिवशी थेट चाल करत गनिमी काव्याने आंदोलकांनी तहसील कचेरीत घुसून एका मजल्याचा ताबा घेतला. आंदोलनात महिलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पोलिसांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, वृद्ध महिलेला वाचविताना पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण किरकोळ जखमी झाले. आज, बुधवारी तिसऱ्या दिवशी पुन्हा आंदोलक मोठ्या संख्येने जमले आहेत. त्यामुळे या परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आलेत. एक वाजता भर उन्हात आंदोलकांनी आपली जेवणे उरकून घेत पुन्हा नव्या दमाने आग ओकणाऱ्या सूर्याला अंगावर घेत आपल्या मागण्यांची बरसात कायम ठेवली.बैठक सुफळ झाल्याचे वृत्त..!गेल्या तीन दिवसांपासून धरण व  प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात यावर आंदोलक प्रतिनिधी आणि प्रशासनाची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून हे आंदोलन थांबण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Sangliसांगली