शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

नाकाबंदीवेळी मोटारीने धडक दिलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By शरद जाधव | Updated: September 29, 2023 21:10 IST

अंकली येथील घटना; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अंकली (ता. मिरज) येथे पंधरवड्यापूर्वी पोलिसांनी सुरू केलेल्या नाकाबंदीवेळी कारने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या श्रेणी उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. रामराव गोविंदराव पाटील (वय ५५, मूळ रा. डोंगरसोनी ता. तासगाव) असे अधिकाऱ्याचे नाव आहे.

गुरूवार दि. १४ रोजी अमावस्या असल्याने सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अंकली फाटा येथे नाकाबंदी लावली होती. तेथे जखमी पाटील यांच्यासह इतर पोलिसांचे पथक वाहनांची तपासणी करत होते. रात्री पावणे एकच्या सुमारास मिरजेकडून एक मोटार (एमएच ४२ बीजे ४६९३) भरधाव तिथे आली. पोलिस पथकाने या वाहनचालकाला थांबवण्याचा इशारा केला. त्यातच या चौकातील वळण वाहनचालकाच्या लक्षात न आल्याने त्याने रस्त्यावर थांबलेल्या पाटील यांना जोरदार धडक दिली.

यात गंभीर जखमी झालेल्या उपनिरीक्षक पाटील यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचे निधन झाले. पाटील यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस दलातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस