शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: देशातील स्त्रियांवर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार; स्त्रीमुक्ती संघर्ष चळवळ परिषदेत महिलांचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 17:53 IST

कासेगाव : आज देशात स्त्रियांवर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहेत. त्यांना गुलाम करण्याचा डाव आखला जात आहे. प्राथमिक ...

कासेगाव : आज देशात स्त्रियांवर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहेत. त्यांना गुलाम करण्याचा डाव आखला जात आहे. प्राथमिक शाळा बंद करून शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. हे आम्ही सहन करणार नाही. यासाठी आता स्त्रियांना जागृत करून स्त्रीमुक्ती संघर्ष चळवळ नव्या जोमाने सुरू करण्याचा निर्धार कासेगाव येथील क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारात भरलेल्या स्त्रीमुक्ती संघर्ष चळवळीच्या परिषदेत करण्यात आला.श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात विविध चळवळी, कष्टकरी जनतेच्या चळवळी चालू आहेत. यामध्ये स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. या स्त्रियांच्या वतीने तीन जिल्ह्यांतील स्त्रियांची परिषद आयोजित केली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. नागमनी राव होत्या.यावेळी त्या म्हणाल्या की, ८० च्या दशकात राज्यभर मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्या चळवळी सुरू होत्या. परित्यक्ता स्त्रियांना स्वतंत्र रेशन कार्ड, घर, पोटगी, घरामध्ये पुरुष आणि स्त्री यांनी समान काम करणे अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन आंदोलने चालू होती. आता पुन्हा पुरुषांच्या सोबतीने चळवळ सुरू केली पाहिजे.यावेळी चंद्रपूरवरून आलेल्या सुजाता कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक ज्योती निकम यांनी केले. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत यांनी स्त्रीमुक्ती संघर्ष चळवळीच्या ठरावाविषयी स्पष्टीकरण केले आणि पुढील काळात स्त्रियांच्या विषयी खास घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांबाबतीत मार्गदर्शन केले.परिषदेस वैशाली जांभळे, ममता भातुसे, सरिता आरगडे, आशा आरगडे, इंदुबाई थोरवडे, सुषमा कांबळे, अनिता देसाई, पार्वती देसाई, संजना डांगरे, चंद्रकला नांगरे, यांच्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो स्त्री कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

टॅग्स :SangliसांगलीWomenमहिला