शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

स्वत:वर गोळी झाडून घेत सांगलीतील जवानाने संपवले जीवन, जम्मू-कश्मीरमध्ये बजावत होता सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 17:35 IST

दोन वर्षांपूर्वी सैन्य दलात भरती

तासगाव : यमगरवाडी (ता. तासगाव) येथील मयूर लक्ष्मण डोंबाळे (वय २३) या जवानाने जम्मू-कश्मीरमधील सांबा जिल्ह्यात कर्तव्यावर असताना स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. या घटनेने यमगरवाडीसह तासगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मयूर दोन वर्षांपूर्वीच भारतीय सैन्य दलात भरती झाला होता.यमगरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील मयूर डोंबाळे दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. त्याची नियुक्ती जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात होती. तेथील महेश्वर सैन्य शिबिरात त्याने कर्तव्यावर असताना शुक्रवारी स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. शुक्रवारी कुटुंबीयांना ही बातमी समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

परिसरात हळहळमयूरची कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातील होती. त्याचे शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून झाले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो देशसेवेसाठी सैन्य दलात भरती झाला होता. मात्र त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sangliसांगली