शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मूठभर श्रीमंत लोक जगाची अर्थव्यवस्था पोखरत आहेत, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गणेश देवींनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 12:59 IST

'जी. डी. बापूंनी स्त्रियांबाबत झालेल्या अत्याचाराला तोंड फोडण्यासाठी केलेल्या कार्याची पुनरावृत्ती होणे गरजेचे'

कुंडल : मूठभर श्रीमंत लोक जगाची अर्थव्यवस्था पोखरत आहेत. अशा वृत्ती राेखण्यासाठी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू यांनी सावकारांविरोधात उभा केलेला लढा पुन्हा उभारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गणेश देवी यांनी केले.कुंडल (ता. पलूस) येथे रविवारी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉ. गणेश देवी यांना खासदार श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते क्रांतिअग्रणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बाेलत हाेते. यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, आमदार अरुण लाड प्रमुख उपस्थित होते.गणेश देवी म्हणाले, बिल्कीस बानोवर झालेल्या अत्याचाराबाबत घडलेल्या घटना निंदनीय होत्या. अशा घटनांमध्ये जी. डी. बापूंनी स्त्रियांबाबत झालेल्या अत्याचाराला तोंड फोडण्यासाठी केलेल्या कार्याची पुनरावृत्ती होणे गरजेचे वाटते. जगात जेवढ्या क्रांती झाल्या त्या सगळ्या फसल्या, पण या भागात जी क्रांती उभी राहिली, ती फसली नाही. ती हसली, हे केवळ जी. डी. बापूंसारख्या प्रगल्भ स्वातंत्र्य सैनिकांमुळेच. या पुरस्काराच्या माध्यमातून मी बापूंची मूल्ये समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न करेन.श्रीनिवास पाटील म्हणाले, या भागाचे बापूंनी नंदनवन केले. बापूंनी स्वातंत्र्यानंतरही या भागासाठी केलेले कार्य अतुल्य आहे. त्यांचा प्रगल्भ वारसा आमदार अरुण लाड समर्थपणे चालवत आहेत.अरुण लाड म्हणाले, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड हे कसे जगले, त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान, त्यांनी केलेला त्याग नवीन पिढीला माहिती व्हावा, म्हणून समाजात अलौकिक काम करणाऱ्या व्यक्तींना क्रांतिअग्रणी पुरस्कार देण्यात येत आहे.प्रारंभी डॉ. जी. डी. (बापू) लाड, विजयकाकू लाड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जयवंत आवटे यांनी स्वागत केले. सर्जेराव खरात यांनी मानपत्राचे वाचन केले. गोविंद जाधव यांनी आभार मानले. श्रीकांत माने यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, उद्योजक उदय लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, ॲड. सुभाष पाटील, ॲड. सयाजीराव पाटील, सरपंच प्रमिला पुजारी, बाबुराव गुरव, मारुती शिरतोडे, श्रीकांत लाड, नंदा पाटील, पूजा लाड, सर्जेराव पवार, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, अशोक पवार, मुकुंद जोशी, व्ही. वाय. पाटील, डॉ. प्रसन्न विभूते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली