शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘शिक्षक भारती’च्या लढ्याला यश; शिक्षकांच्या दोन वर्षांच्या वैद्यकीय बिलासाठी १० कोटी

By अशोक डोंबाळे | Updated: December 30, 2023 14:20 IST

शिक्षकांच्या थकीत वैद्यकीय बिलाचा प्रश्न सुटणार

सांगली : जिल्ह्यातील शिक्षकांच्यावैद्यकीय बिलांचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला दहा कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. शासनाकडून निधी मिळाल्यामुळे प्रलंबित वैद्यकीय बिलांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. वैद्यकीय बिलाच्या प्रश्नासाठी ‘शिक्षक भारती’ने शासनाकडे पाठपुरावा केला होता.जिल्ह्यातील शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांसाठी गेल्या दोन वर्षांपासून शासनाने अनुदान दिले नव्हते. त्यामुळे आजारी हजारो शिक्षकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. यामुळे आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेला वैद्यकीय बिलांसाठी १० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्य शासनाकडून वेतन सोडून वैद्यकीय बिल, फरक बिलासाठी गेल्या दोन वर्षांपासून अनुदान मिळाले नाही. त्यामुळे वैद्यकीय बिल, फरक बिल यांचे पैसे मिळावेत, यासाठी शिक्षकांनी शिक्षक भारती संघटनेकडे मागणी केली होती. आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे, सरचिटणीस कृष्णा पोळ, दिगंबर सावंत यांनी मंत्रालयीन पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला. शिक्षकांना त्यांच्या वैयक्तिक आजारपणासाठी, कुटुंबातील आई, पत्नी, वडील, मुलगा, मुलगी आदींच्या आरोग्यासाठी वैद्यकीय खर्च केला होता. शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडे वैद्यकीय बिल सादर केली होती; पण गेल्या दोन वर्षांपासून अनेक शिक्षकांची बिले प्रलंबित आहेत. यामध्ये अनेक दुर्धर आजारी शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांना जिल्हा परिषदेने तातडीने निधी वर्ग करण्याची गरज आहे.

शालार्थ वेतन प्रणालीत ऑनलाइन पैसे वर्ग कराशिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस कृष्णा पोळ, दिगंबर सावंत, सचिन कुंभार यांनी शिक्षण उपसचिव सुनील हंजे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी सुनील हंजे यांनी वैद्यकीय बिलांसाठी लागणारा निधी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला वर्ग केला आहे. शिक्षकांचे वैद्यकीय बिल शालार्थ वेतन प्रणालीत ऑनलाइन करण्याची सूचना शिक्षण संचालकांनीही दिली आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे सरचिटणीस कृष्णा पोळ यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षकMedicalवैद्यकीय