शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीच्या ओढ्याला आला पाचशेच्या नोटांचा पूर, नोटांसाठी नागरिकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 12:38 IST

लाखो रुपये नागरिकांना सापडले: नव्याबरोबर जुन्याही नोटा; पोलिसांच्या हाती लागले केवळ दहा हजार रुपये, अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, आटपाडी (जि.सांगली): चक्क ओढ्याच्या पाण्यामध्ये हजार, पाचशे, पन्नास, वीस, दहा रुपयांच्या नोटा वाहत आल्याचा प्रकार आटपाडी शहरातील शुक ओढ्यात अंबाबाई मंदिर परिसरामध्ये शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास निदर्शनास आला. पैसे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. मात्र, हे पैसे कुठून आले, याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळाली नाही. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी येऊन सुमारे दहा हजार रुपयांच्या नोटा जप्त केल्या. अज्ञाताविरुद्ध गुन्हाही दाखल केला.

शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास काही विद्यार्थी ये-जा करत असताना गदिमा पार्ककडे जाणाऱ्या छोट्या पुलाशेजारील ओढ्यामध्ये पाचशेच्या नोटा दिसल्या. त्यांनी पाण्यात जाऊन पाहिले असता पाचशेच्या अनेक नोटा दिसल्या. दरम्यान, शनिवारी येथील रस्त्यावर बाजार भरत असल्याने विक्रेते व नागरिक मोठ्या प्रमाणात जमले होते. अनेकांनी ओढ्याच्या पाण्यात जाऊन शोधमोहीम घेतली असता त्यांना पाचशेच्या अनेक नोटा सापडल्या.

प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पैसे?

दरम्यान, हे पैसे कोठून येत आहेत, याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही. एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पैसे असल्याची चर्चा यावेळी नागरिकांमध्ये होती. यामध्ये काही जुन्या व नवीन नोटा सापडल्याने मोठी खळबळ माजली होती.

पोलिसांनी जप्त केल्या नोटा

- ओढ्यामध्ये जुन्या व नवीन बँक नोटा वाहत असल्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर आटपाडी पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस अधिकारी व अंमलदार घटनास्थळी तत्काळ दाखल झाले.- घटनास्थळावरून जुन्या पाचशे रुपयांच्या १४ नोटा, हजार रुपयांची १ नोट असे आठ हजार रुपये व नवीन पाचशे रुपयांच्या ४, पन्नास रुपयांच्या ३, दहा रुपयांच्या ११, पाच रुपयांच्या २ आणि २० रुपयांची एक अशा एकूण १० हजार २९० रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगली