शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त, ३१ जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 18:34 IST

मागील सव्वा वर्षापासून थांबलेली चौकशी पुन्हा सुरू

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सहकार विभागाने विभागीय सहनिबंधक डी. टी. छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीला तातडीने चौकशी करून ३१ जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सोमवारी यासंदर्भातील आदेश तक्रारदार तसेच समिती सदस्यांना पाठविले आहेत. जिल्हा बँकेतील कारभाराबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी स्वतंत्रपणे सहकार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर विद्यमान अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनीही मागील काळात संचालक असताना तक्रार केली होती. याप्रकरणी सहकार आयुक्तांनी सहकार अधिनियमातील कलम ८१ नुसार चाचणी लेखापरीक्षण अथवा कलम ८३ नुसार सखोल चौकशीचे आदेश यापूर्वी दिले होते. परंतू चौकशीला २३ सप्टेंबर २०२१ रोजी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी सहकारमंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन जिल्हा बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मागील सव्वा वर्षापासून थांबलेली चौकशी पुन्हा सुरू झाली आहे.जिल्हा बँकेकडून सरफेसी कायद्यांतर्गत कर्जदार संस्थांची मालमत्ता विक्री, संस्था, कंपनी व महिला बचत गटाचे ६० कोटींचे कर्ज निर्लेखित करणे, संचालकांच्या कारखान्यास ३२ कोटी रुपयांचे कर्ज शिफारस नसताना देणे, स्वप्नपूर्ती शुगर्स कारखान्यास चुकीच्या पध्दतीने २३ कोटी रुपये कर्ज वाटप, २१ तांत्रिक पदांची बोगस कागदपत्रांच्या आधारे भरतीबाबत तक्रार केली होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याशी संबंधित रायगाव (ता. कडेगाव) येथील केन ॲग्रो कंपनीला दिलेल्या १६५ कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीबाबत बँकेच्या धोरणावर आक्षेपही घेण्यात आला होता. अखेर जिल्हा बँकेच्या व्यवहारासंदर्भात चौकशीवरील स्थगिती उठविण्यात आली आहे.छत्रीकरांच्या अध्यक्षतेखाली समितीकोल्हापूर येथील विभागीय सहनिबंधक डी. टी. छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत कोल्हापूरचे तृतीय विशेष लेखा परीक्षक शीतल चोथे, अनिल पैलवान, रघुनाथ भोसले, सांगलीचे विशेष लेखा परीक्षक संजय पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

समितीकडे उरले २० दिवससमितीला त्यांचा चौकशी अहवाल ३१ जानेवारी २०२३ पर्यंत सादर करायचा आहे. चौकशी करण्यासाठी त्यांच्याकडे केवळ २० दिवस उरले आहेत. त्यामुळे मंगळवारी १० जानेवारीपासून चौकशीस सुरुवात होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक