विटा : राजकीय अधोगती व्हावी यासाठी भाजपचे नेते माजी आ. ॲड. सदाशिवराव पाटील यांच्या विटा येथील राहत्या घरासमोर एका बंगाली बाबूने भानामतीचा प्रकार केल्याची घटना २६ जानेवारी रोजी भरदिवसा घडली. हा प्रकार करीत असताना बंगाली बाबूसह दोघांना नागरिकांनी पकडून चोप देत शहरातून धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी बंगाली बाबू इस्त्राफिल रियाजउद्दीन मलिक (वय ४२, रा. युनियन बॅँकेजवळ, विटा) आणि सुनील वसंत मेटकरी (४४, रा. विटा) या दोघांविरुद्ध विटा पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंध कायदान्वये गुन्हा दाखल केला. विटा येथील यशवंतनगर येथे माजी आ. ॲड. सदाशिवराव पाटील यांचे निवासस्थान आहे. २६ जानेवारी रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास काळी जादू करणारा बंगाली बाबू इस्त्राफिल मलिक हा तेथे आला. त्यावेळी त्याने मोठमोठ्याने मंत्रोच्चार करीत त्याच्या अंगात एखादी अंतेंद्रिय शक्ती असल्याचे भासवून माजी आ. पाटील यांच्या घरासमोरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ माती, उडीद, काळे तीळ, मोहरी अशा जादूटोणा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू टाकल्या.हा प्रकार सुरू असताना स्थानिक लोकांनी पाहिल्यानंतर बंगाली बाबूने तेथून पळ काढला.त्यानंतर माजी आ. पाटील यांच्या कार्यकर्त्यांना हा प्रकार समजल्यानंतर बंगाली बाबूचा शोध घेतल्यानंतर तो सापडला. त्यावेळी त्याने सुनील वसंत मेटकरी याच्या सांगण्यावरून हा प्रकार केल्याची कबुली दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी सुनील मेटकरी याला ताब्यात घेऊन चोप देत या दोघांची शहरातून धिंड काढली. यावेळी या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी या दोघांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी केली. विटा पोलिस ठाण्याच्या आवारात तब्बल दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांनी गर्दी केली.या प्रकारानंतर माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील हे विटा पोलिस ठाण्यात आले. त्यावेळी बंगाली बाबू इस्त्राफिल मलिक व सुनील मेटकरी यांचे मोबाईल फोन काढून घेऊन मोबाईलची तपासणी केली असता त्यात माजी आ. ॲड. सदाशिवराव पाटील यांच्या जुन्या व नवीन घरांचा नकाशा मिळाला. या प्रकाराने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यावेळी बंगाली बाबू मलिक याने सुनील मेटकरी याच्या सांगण्यावरून ॲड. वैभव पाटील यांची राजकीय अधोगती व्हावी व त्यांच्यात आणि प्रकाश कदम यांच्यात न्यायालयात सुरू असलेल्या जमिनीच्या वादात तडजोड व्हावी यासाठी हा प्रकार केल्याची कबुली पोलिसांना दिली.
Web Summary : A Bengali man performed black magic at ex-MLA Sadashivrao Patil's home in Vita, Sangli, for political downfall. Locals caught and thrashed him and an accomplice, handing them to police. A case is registered under anti-superstition laws.
Web Summary : सांगली के विटा में पूर्व विधायक सदाशिवराव पाटिल के घर पर एक बंगाली व्यक्ति ने राजनीतिक पतन के लिए भानामती की। स्थानीय लोगों ने उसे और एक साथी को पकड़कर पीटा और पुलिस को सौंप दिया। अंधविश्वास विरोधी कानूनों के तहत मामला दर्ज।