शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: रायगावच्या केन ॲग्रोविरोधात २८ शेतकऱ्यांकडून गुन्हा दाखल, शेतकऱ्यांचे तीन कोटी थकीत

By अशोक डोंबाळे | Updated: January 24, 2024 18:52 IST

ऊस उत्पादकांची यादी न्यायालयात सादर

सांगली : थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी २८ शेतकऱ्यांनी रायगाव, ता. कडेगाव येथील केन ॲग्रो साखर कारखान्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. २०१८-१९ च्या गळीत हंगामात ऊस गाळपास दिलेल्या शेतकऱ्यांना बिल मिळाले नाहीत. जवळपास दोन कोटी ९९ लाख रुपये थकीत आहेत.शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले म्हणाले, केन ॲग्रो साखर कारखान्यास २०१८-१९ च्या गळीत हंगामासाठी ऊस घेतलेल्या शेतकऱ्यांना उसाचे बिल मिळाले नाहीत. सांगली जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही उसाची बिलं पाच वर्षांत मिळाली नाहीत. वारंवार कारखाना प्रशासन पैसे देतो, एवढेच सांगत आहेत. पुढे काहीच होत नाही. म्हणूनच शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिलासाठी कडेगाव पोलिस ठाण्यात मंगळवार दि. २३ जानेवारी २०२४ रोजी २८ शेतकऱ्यांनी ऊस बिल मिळावीत, अशी तक्रार दाखल केली आहे. केन ॲग्रो साखर कारखाना प्रशासनाने प्रतिटन २६०० रुपयेप्रमाणे दर जाहीर केला होता. या दरानुसार ऊस गाळप झाल्यापासून १४ दिवसात उसाचे बिल शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहेत. परंतु, जवळपास दोन कोटी ९९ लाख रुपयांचे थकीत बिल शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. महसुली कायद्यातील तरतुदीनुसार वसुलीस दिरंगाई होऊ लागल्याने 'ऊस नियंत्रण आदेश- १९६६' व ' आवश्यक वस्तू अधिनियम - १९५५' मधील फौजदारी नियमानुसार ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी साखर कारखाना प्रशासनाने फसवणूक केली आहे. पैशाचा गैरवापर, विश्वासघात केला, या कारणाने कारखाना चालक व कारखाना प्रशासन विरुद्ध पोलिसांत ही तक्रार दिली आहे.ऊस बिल मिळण्यासाठी तक्रारदार बाळासाहेब चव्हाण, राहुल सावंत, रामचंद्र कणसे, फुलाबाई सावंत, नारायण कणसे, पोपट देवकर, ईश्वर कणसे, लक्ष्मण कदम, भीमराव जरग, रामचंद्र उथळे, भीमराव मोहिते आदी २८ शेतकऱ्यांनी कडेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ऊस उत्पादकांची यादी न्यायालयात सादर२०१८-१९ च्या गळीत हंगामातील दोन कोटी ९९ लाख रुपये शेतकऱ्यांचे देणे आहे. या शेतकऱ्यांची यादी न्यायालयात आम्ही सादर केली आहे. न्यायालयाकडून संबंंधित शेतकऱ्यांना निश्चित पैसे मिळणार आहेत. २०२०-२१ नंतर एकाही शेतकऱ्यांचे पैसे थकीत राहिले नाहीत, असा खुलासा केन ॲग्रो साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जयकर पाटील यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने