शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Sangli: भोसेतील ४०० वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला, सततच्या पावसाने मुळासकट उन्मळून पडला

By अविनाश कोळी | Updated: June 10, 2024 19:07 IST

महामार्गास अडथळा ठरणाऱ्या या वृक्षाला वाचवण्यासाठी वनराई संस्थेसह पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले होते.

सांगली : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे (ता. मिरज) येथे असलेले ४०० वर्षांपूर्वीचे वडाचे झाड सोमवारी सलग पाऊस व वाऱ्यामुळे कोसळले. महामार्गास अडथळा ठरणाऱ्या या वृक्षाला वाचवण्यासाठी वनराई संस्थेसह पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले होते. मात्र महामार्गाच्या कामात कमकुवत झालेला हा वृक्ष सततच्या पावसाने सोमवारी कोसळला. या वृक्षाचे आहे त्या जागी पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.भोसे येथील यल्लम्मादेवी मंदिरासमोर सुमारे चारशे वर्षांपूर्वीचा हा वटवृक्ष आहे. नागपूर रत्नागिरी महामार्गास अडथळा ठरणारा हा वृक्ष तोडण्याचा घाट महामार्ग प्राधिकरणाने घातला होता. मात्र, पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि वनराई संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वटवृक्षाखालीच उपोषण करून वृक्षतोडीला विरोध केला. या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा वटवृक्ष तोडू नये, असे आदेश दिले. यासाठी कायद्यामध्येही बदल करण्यात आले.त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही वटवृक्ष न तोडता रस्त्याचा आराखडा बदलण्याचे आदेश दिले. त्यानुसार नव्याने आराखडा बनवत वटवृक्षाला खेटून हा महामार्ग पुढे नेण्यात आला. मात्र, या कामाच्या दरम्यान, वृक्षाची मुळे कमकुवत झाली असावीत. गेले पाच दिवस या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. ओढ्याला प्रचंड पाणी असल्याने हा वटवृक्ष स्वतःच्याच भाराने कोसळला.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्ग